‘कशाला चॅलेंज देतो, गप मर ना’; मनोज जरांगेंनी भुजबळांना शेवटचं सांगितलं

‘कशाला चॅलेंज देतो, गप मर ना’; मनोज जरांगेंनी भुजबळांना शेवटचं सांगितलं

Manoj Jarange Patil : ओबीसी मंडल चॅलेंज करण्याबाबत मला कशाला चॅलेंज देतो, गप मर ना, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शेवटचं सांगितलं आहे. दरम्यान, जालन्यात मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

‘गुन्हेगारांवर सरकारचा धाक राहिला नाही’; बाळासाहेब थोरातांचा सरकारवर हल्लाबोल

मनोज जरांगे म्हणाले, उद्यापासून आमरण उपोषण सुरु होणार आहे. उपोषणादरम्यान सरकारने दिलेल्या अध्यादेशाबाबत चर्चा होणार असून सगेसोयऱ्याच्या मागणीबाबत सरकारकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. तसेच हैद्राबाद संस्थान गॅझेट, अंतरवली केसेस संदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. यावेळी उपोषणादरम्यान, पाणी, उपचार काहीच नाही घेणार नाही. कठोर उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य गुंडांच्या तावडीत, फडणवीस राजीनामा द्या; घोसाळकर गोळीबारानंतर राऊतांचे टीकास्त्र

तसेच छगन भुजबळांना म्हणावं, कशाला चॅलेंज देतो म्हणावं..गप मर ना..मला का चॅलेंज देतो गप रहा..पाटील आहे म्हणूनच ओबीसीमध्ये मराठ्यांना घुसवून दाखवलं आहे. गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करु नको असं म्हणून तू चॅलेजं करु नको, त्याला समजून सांगा नाहीतर मला चॅलेंजच करावं लागणार असल्याचं मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना उद्देशून म्हटलं आहे.

सगेसोयरे कायद्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नाही. येत्या 15 तारखेला सरकारचं अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशन झाल्यानंतर आमचा काही उपयोग होणार नाही. याआधी नागपूर अधिवेशनाला असंच झालं होतं. त्यावेळीही आम्ही सांगितलं होतं. मराठा कुणबी एकच आहे, जीआरमध्ये दुरुस्ती करा. आता 15 तारखेला पुन्हा अधिवेशना त्यामुळे 10 तारखेला उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube