मुंबईः विशेष प्रतिनिधी (प्रफुल्ल साळुंखे)-मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भूमिकेवर आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वतंत्र बैठक घेत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन पेटले होते. हे आंदोलन सध्या तरी शांत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वातावरण निवळण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण काहीच दिवसात छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. छगन भुजबळ हे बीड दौऱ्यावर गेले. त्यांनी हे सरकार मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमध्ये मागच्या दाराने घुसवत असल्याचा आरोप केला. सरकारला हे महागात पडेल असा इशारा देखील दिला आहे. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्या वक्तव्यच्या विरोधाभास समोर आला. भुजबळ यांच्या वक्तव्यावरून आज मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होईल अशी शक्यता होती. पण या बैठकीत याविषयी कुठलीही चर्चा करण्यात आली.
कार्तिकी एकादशीच्या महापूजेचं निमंत्रण फडणवीस-अजितदादांना नाही; मंदिर समितीचा निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीनंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निवडक आठ मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावली होती. या बैठकीत छगन भुजबळ यांनी सरकारविरोधी भूमिका का घेतली यावर चर्चा झाली. राज्यात सर्वत्र वातावरण निवळत असताना हा मुद्दा उपस्थित करण्याची आवश्यकता नव्हती, असा मुद्दा शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ही सरकारने भूमिका घेतली आहे. मग हा प्रश्न कुठून निर्माण होती अशी नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं मान्यच नाही’
या मुद्द्यावर जवळपास दीडतास चर्चा झाली.
राज्यात मराठा आरक्षणाबाबत सर्व श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जात आहे. हे पाहाता ओबीसी आरक्षण मुद्दा उपस्थित करुन मुख्यमंत्री शिंदे यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे का? भुजबळ यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हे सर्व सुरू आहे का? असे अनेक प्रश्न शिवसेनेच्या मंत्री यांनी यावेळी उपस्थित केले आहे.
राज्यात नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे ओबीसी समाजात मोठे प्रस्थ यात पुन्हा स्पेस निर्माण करण्याचा भुजबळ हे प्रयत्न करताय का ? असा टोमणा एका मंत्र्याने यावेळी मारला. शिवसेनेचे शिंदे गटाने मराठा, राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी आणि भाजपने धनगर अशा भूमिका घेतल्याने हे सर्व ठरवून होतंय का ? अशी चुकीची भावना जनतेत जाऊ नये, अस मत एका मंत्र्यांनी उपस्थित केले. या पुढे जाती-जातीवरून वाद निर्माण होणार नाही, असे कुठलेही विधान कोणी करू नये, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक संपताना दिली आहे.