Download App

Morning Oath Ceremony : पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कोणाचं? छगन भुजबळांनी थेट नावंच सांगितलं

धनंजय मुंडेंनी म्हटलं की, पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं. जर षडयंत्र होतं तर कोणी रचलं? उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत.

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी हा षडयंत्राचा भाग होता, असं खळबळजनक विधान केलं. मुंडेंनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला. दरम्यान, मुंडेंच्या या विधानावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी भाष्य केलं.

धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, गोपीनाथ मुंडे असते तर लाथ मारून…; नितीन देशमुखांचा निशाणा 

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना मुंडेंच्या वक्तव्याविषयी विचारले असता भुजबळ म्हणाले की, धनंजय मुंडे यांचं भाषण झालं तेव्हा मी त्या ठिकाणी नव्हतो. मात्र, मी माध्यमांमधून त्यांच्या भाषणाविषयी ऐकलं. धनंजय मुंडेंनी म्हटलं की, पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं. जर षडयंत्र होतं तर कोणी रचलं? उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेसचेही नेते षडयंत्र रचू शकत नाही. मग षडयंत्र कोणी रचलं?, असा सवाल भुजबळांनी केला.

धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, गोपीनाथ मुंडे असते तर लाथ मारून…; नितीन देशमुखांचा निशाणा 

भुजबळ पुढे म्हणाले, मग हे षडयंत्र राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी रचलं? याची काही माहिती नाही. मात्र, मला आठवतं की, २०१९ मध्ये बैठका चालू होत्या. त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्यात थोडा वाद झाला होता, तेव्हा शरद पवार रागाने निघून गेले होते. पण त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरूच होत्या. त्याप्रमाणे आठ वाजता एका ठिकाणी बैठक बोलावण्यात आली. मात्र, त्या बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते, असं भुजबळ म्हणाले.

अजित पवार बैठकीला उपस्थित नव्हते तेव्हा आम्हाला वाटलं की ते कुठं काही कामात अडकले असतील. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी टीव्ही चालू केला तेव्हा लक्षात आलं की, अजित पवारांचा शपथविधी झाला. त्यानंतर मी तातडीने शरद पवारांकडे गेलो, तेव्हा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि सांगितलं की आपण मजबुतीने उभं राहिलं पाहिजे, असं पवारांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं, असं भुजबळांनी सांगितलं.

नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला राज्य सरकारने स्थगिती दिली. त्यावरही भुजबळांना भाष्य केलं. ते म्हणाले की, काहीतरी अडचणी निर्माण झाल्या असतील, त्यामुळं नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली असेल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसच्या दौऱ्यावर आहेत. ते दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्याशी या विषयावर चर्चा करतील आणि त्यावर नक्कीच मार्ग काढतील, असं भुजबळ म्हणाले.

follow us