Eknath Shinde : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या माध्यमातून ठाकरे सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, आज विधानसभेत बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावरून (Covid Scam) ठाकरे गटावर जोरदार टीका केली.
साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ कांदबरीला यंदाचा मान
विधीमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, कोविड काळात लोकं मरत होती आणि हे लोक पैसे खात होती. या कोरोना काळात लोक भीतीच्या वातावरणात जगत असताना पैशांची लूट सुरू होती. कफन चोर, खिचडी चोर अशी बिरुद कमी पडतील इतका भ्रष्टाचार झाला. ऑक्सिजन प्लांटमध्येही भ्रष्टाचार झाला. काही लोकांच्या मेहरबानीने उत्तर प्रदेशातील एका हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले. आदित्य राजाच्या कृपेने वरून राजाच्या टेंडरचा पाऊस पडला. कोविड काळात झालेला हा भ्रष्टाचार म्हणजे मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार. या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा अरेबियन नाईट्सच्या कथांपेक्षाही सुरूस आहेत, अकल्पित आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
Nitish Kumar : काँग्रेसची गुगली अन् ममतांचा डाव! संयोजकानंतर PM पदाच्या शर्यतीतूनही नीतीशकुमार OUT
आदित्य राजाच्या कृपेन वरूण राजानं टेंगरचा पाऊस पाडला. रोमीन छेडा हा भ्रष्ट्राचारातलीा एक प्यादा. या भ्रष्टाचाराची सुरुवात मुंबईतील वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षापासून झाली. पेंग्विन कक्षाचे काम या हायवे बांधकाम करणाऱ्या कंपनीला देण्यात आले होते. रोमिन छेडाला 57 कंत्राट देण्यात आली. पेंग्विननंतर ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही याच कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीला नंतर पालिका शाळांना वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम देण्यात आले. याशिवाय फिल्टर पंप व इतर अनेक कामे देण्यात आली.
या कंपनीला जुहू हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचे काम देण्यात आले होते. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये काम दिले गेले. महापालिकेच्या रुग्णालयात एसीशी संबंधित कामही दिले पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवांशी किती खेळ करायचा, ही कंपनी काय काय करते याची व्याप्ती खूप विस्तृत आहे. छेडा हा मल्टिटॅलेंडेंड, मल्टिपर्जज माणूस आहे. सबका मालिका एक. आणखी बरीचं कंत्राट दिली आहे. तुम्ही रोज आमच्यावर आरोप करणार पण, आता हे पुराव्यानिशी सर्व काही बाहेर येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
रस्ते बांधणी करणाऱ्या कंपनीला कंत्राट देऊन या लोकांनी आरोग्य यंत्रणा रस्त्यावर आणली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी. सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी अशा पध्दतीने काम करणारे लोक जनतेचं कसं भलं करू शकतात. सुजित पाटकर यांच्या कंपनी द्वारे बनावट रुग्ण व औषधे दाखवण्यात आली. महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम झालं, असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी केला.
आरोग्य व्यवस्था चोख आहे, असं भासवून घरी बसणाऱ्यांनी देशात एक क्रमांकाचे मुख्यमंत्री असं प्रमाणपत्र मिळवलं, पण, ते शेवटून पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते, असा टोलाही सीएम शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
या आधीच्या सरकारने खिचडीत मोठा घोटाळा केला. कोविड काळात रुग्णांना 300 ग्रॅम ऐवजी 100 ग्रॅम खिचडी देण्यात आली. यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आणि धनादेशाद्वारे कोणाला पैसे देण्यात आले याचे पुरावे आहेत. त्यामुळे यातून कोणीही वाचणार नाही. सह्याद्री रिफ्रेशमेंटच्या नावाखाली हा सगळा गैरकारभार झाला आहे, त्याचे पुरावे आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.