Download App

‘त्या’ वक्तव्यावर संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्टीकरण; ‘लफडी’ या शब्दाचा अर्थ…

  • Written By: Last Updated:

लफडी या शब्दाचा अर्थ, आर्थिक घोटाळ्याशी संबंधित होता. आर्थिक हितसंबंधाची लफडी अशा आशयाने होता, असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलं आहे. काल एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर राज्यभरातून टीका सुरु असताना त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की सुषमा अंधारे यांना मी बहिणी मानतो, आमचं बहिण आणि भावाचं नातं आहे. माझ्या बायकोनं त्यांची ओटी भरली होती, असे म्हणत माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला.

सावरकर वाद! ठाकरेंची बाजू घेत शरद पवार यांनी राहुल गांधींना सुनावलं

तर स्पष्टीकरण देत असताना त्यांनी पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनाही पुन्हा टोला लगावला आहे. ते म्हणाले की महिला म्हणून त्यांनीही बोलताना विचार करायला हवा. त्या आम्हा सगळ्यांना भाऊ म्हणतात आणि संज्या म्हणून बोलतात. मला वरातीतील घोडा असं त्या म्हणाल्या, त्यांना हे शोभतं का?

दरम्यान महिला आयोगाकडून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या पत्राची दखल घेण्यात आली आहे. महिला आयोगाने संजय शिरसाटांचे सगळे व्हिडीओ पोलिसांकडून मागवून घेतले आहे. हे सर्व व्हिडीओ तपासून महिला आयोग निर्णय घेणार आहे. लवकरत हे व्हिडीओ तपासून महिला आयोग कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

शिरसांटांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि ठाकरे गटाकडून अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण पोलिसांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोागाता दरवाजा ठोठावला आहे. संजय शिरसाट यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र त्यांनी महिला आयोगाला पाठवलं आहे.

राघव चड्डा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा झाला? ‘आप’ खासदाराच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण

Tags

follow us