सावरकर वाद! ठाकरेंची बाजू घेत शरद पवार यांनी राहुल गांधींना सुनावलं

सावरकर वाद! ठाकरेंची बाजू घेत शरद पवार यांनी राहुल गांधींना सुनावलं

नवी दिल्ली : राज्यात सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन वाद पेटला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. यातच महाविकास आघाडीचा भाग असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील याप्रकरणावरुन राहुल गांधीना सुनावल आहे. यावरुन आघाडीत बिघाडी होण्यापुर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणात भाग घेत राहुल गांधींना सुनावल आहे. सावरकर यांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, असं म्हणत पवारांनी राहुल गांधी यांना सुनावल आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. यावेळी अनेक पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. परंतु ठाकरे गटाचे खासदार या बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. यावेळी पवार यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत उद्धव ठाकरेंची बाजूने मत देत राहुल गांधी यांना सुनावलं आहे.

Gautami Patil, इंदुरीकर महाराज ते शिवलीला पाटील कोण किती पैसे घेतं?

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांचा काहीही संबंध नाहीये. त्यामुळं सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही. दरम्यान देशात सावरकर यांचा मुद्दा सोडला तर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत ज्याच्यावर चर्चा करायला हवी, असं म्हणत शरद पवारांनी काँग्रेसच्या बैठकीतच राहुल गांधींना खडसावलं आहे.

Explainer Baramati Loksabha : ना कुल, ना जानकर… सुप्रिया सुळे विरोधात भाजपचा उमेदवार ठरला!

…तर महाविकास आघाडीत बिघाडी झाली असती
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण पेटलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर एका जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांना सुनावलं होत. यामुळे आता महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube