CM Devendra Fadanvis Inaugurate Mumbai Metro 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (CM Devendra Fadanvis) हस्ते मुंबई मेट्रो-३ ‘बीकेसी ते आचार्य अत्रे’ मार्गाचे लोकार्पण करण्यात आलंय. कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे’ मेट्रो 3 ( Metro 3) मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा 2 अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा2 A ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 3 च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती होते.
नगर जिल्हा हादरला! वृद्ध महिलेची हत्या करून मृतदेह घरातच जाळला
देशभरात सध्या भारत पाकिस्तान युद्धाचं वातावरण आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहेत. यावेळी महाराष्ट्राच्या सुरक्षेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस, कोस्टगार्ड, नेव्ही अलर्टवर आहेत. नियमितपणे आवश्यक ते सर्व आम्ही केलं आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी आम्ही बैठक बोलवली आहे. आम्ही अलर्टवर आहोत, असं देखील फडणवीसांनी म्हटलंय.
मेट्रोसोबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ही सर्वांत मोठी भूमिगत मेट्रो आहे. कफ परेड ते आरे एकूण 33 किलोमीटर लांबीपैकी 13 किमी रस्ता आपण सुरु केली होती, आज 9 किमीचा रस्ता सुरू करतोय. उद्यापासून नियमितपणे सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात आणि महाराष्ट्रात मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले. मध्यंतरी अडीच वर्षे काय अडचणी होत्या, ते आपल्याला ज्ञात आहे, त्यावर मात करून आपण अंतिम टप्प्यात आलो आहोत. अत्रे चौक ते कफ परेड हा शेवटचा टप्पा ऑगस्ट महिन्यात जनतेसाठी खुला होईल. त्यासाठी आम्ही पंतप्रधानांना निमंत्रित करू.
ब्रेकिंग : IPL 2025 स्थगित; भारत-पाकिस्तान तणावादरम्यान BCCI चा मोठा निर्णय
दोन स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेट्रोला चांगला प्रतिसाद आहे, तो आणखी वाढेल, मेट्रो 3 एअरपोर्टसाठी सुविधापूर्ण असेल असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय. वित्त आयोगाचे अध्यक्षांनी महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांबाबत समाधान व्यक्त केले, ते किती निधी देतील माहिती नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.