India Pak Tension : वाहनधारकांना मोठा दिलासा, पेट्रोल पंप असोसिएशनने ‘तो’ मोठा निर्णय मागे घेतला

India Pak Tension : वाहनधारकांना मोठा दिलासा, पेट्रोल पंप असोसिएशनने ‘तो’ मोठा निर्णय मागे घेतला

Petrol Pump Withdraw Decision Not Accept Payments Through UPI : वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. उद्यापासून पेट्रोल पंप (Petrol Pump) मालकांनी UPI आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पैसे न स्वीकारण्याची घोषणा केली होती. परंतु भारत पाकिस्तानच्या युद्धाची (India Pak Tension) सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळत आहे. यामुळे वाहन धारकांच्या पेट्रोल पंपांवरील अडचणी कमी होणार आहेत.

राज्याच्या पेट्रोलियम डीलर्स (Petrol Pump Payment) असोसिएशनचे माजी अध्यक्ष अली दारूवाला यांनी लेट्सअप मराठीसोबत बोलताना ही माहिती दिली आहे.

विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने म्हटलं होतं की, सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोल पंप मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतंय. यामुळे त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. फसवणूक करणारे लोकांचे कार्ड किंवा नेट बँकिंग हॅक करतात आणि त्याचा वापर करून पैसे भरतात. मग जेव्हा कोणी या प्रकरणात तक्रार करते, तेव्हा पोलीस व्यवहार रद्द करतात.

India-Pak War : पाकचे ना-पाक इरादे उद्ध्वस्त; 12 तासात काय झालं? 10 अपडेट्स, एका क्लिकवर…

अशा सायबर फसवणुकीमुळे अनेक पेट्रोल पंप मालकांचे खाते पूर्णपणे ब्लॉक करण्यात आल्याचे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे. यामुळे एकीकडे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, तर दुसरीकडे उर्वरित रक्कम मिळण्यास त्यांना अडचणी येत आहेत.

ICAI CA Exam Postponed : भारत-पाक तणावाचा विद्यार्थ्यांना फटका; CA ची मुख्य परिक्षा पुढे ढकलली

नाशिकच्या पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे म्हणाले की, त्यांना या संदर्भात अनेक पेट्रोल पंप मालकांकडून तक्रारी आल्या आहेत. त्यांचे डिजिटल व्यवहार रद्द केले जातात आणि नंतर त्यांचे खाते ब्लॉक केले जाते. पूर्वी ही रक्कम खूपच कमी असायची, त्यामुळे अनेकदा पेट्रोल पंप मालक त्याकडे लक्ष देत नसत. पण आता अशा घटना वाढत आहेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.

याबाबत फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता म्हणतात की, सरकारला याबद्दल माहिती देण्यात आली आहे. पेट्रोल पंप मालक आता योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्यावरच डिजिटल पेमेंट सुरू करतील. आता महाराष्ट्र पेट्रोल पंप असोसिएशन या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचं कळतंय. परंतु सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत हा निर्णय सध्या मागे घेण्यात आलेला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube