India-Pak War : पाकचे ना-पाक इरादे उद्ध्वस्त; 12 तासात काय झालं? 10 अपडेट्स, एका क्लिकवर…

India-Pak War : पाकचे ना-पाक इरादे उद्ध्वस्त; 12 तासात काय झालं? 10 अपडेट्स, एका क्लिकवर…

India Pakistan War Major Updates Several Bunkers Destroyed : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केलंय. या हल्ल्याने घाबरलेल्या पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह अनेक (India Pakistan War) वेगवेगळ्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने हाणून पाडला. याच्या आधीही पाकिस्तानने भारतातील 15 शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला (India Pakistan War Updates) होता. पण भारताच्या एस-400 हवाई संरक्षण यंत्रणेने ते हाणून पाडले. काल रात्रीपासून आताच्या क्षणापर्यंत काय काय झालं, हे जाणून घेऊ या.

1. पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर

एप्रिलमध्ये पहलगाममध्ये दहशतवाद हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. आता दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष सुरू झालाय. भारताने हवाई हल्ल्यांद्वारे त्यांचे अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेत.

2. पाकिस्तानचे 50 ड्रोन पाडले

गुरुवारी रात्री भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात मोठी कारवाई केली. हे ऑपरेशन ड्रोन पाडण्यासाठी होते. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराने 50 हून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडले. पाकिस्तानने भारतीय सीमेत अनेक ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर ऑपरेशन सुरू करण्यात आले. पाकिस्तान वेगवेगळ्या ठिकाणाहून ड्रोन पाठवत होता. भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण युनिटने तात्काळ कारवाई केली. त्यांनी उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट सारख्या भागात ड्रोनना लक्ष्य केले.

भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानचा शहाणपणा; सायबर हल्ल्याचा डाव, ‘या’ प्रोफाईल ‘डेंजर’

3. अमेरिका हस्तक्षेप करणार नाही

अमेरिकेने म्हटलंय की, ते भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संघर्षात हस्तक्षेप करणार नाही. अमेरिका फक्त दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यांना शरण येण्यास सांगू शकत नाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी म्हटलंय की, भारत-पाकिस्तान संघर्षात त्यांचा मुळात काहीही संबंध नाही.

4. सौदी आणि इराणचे मंत्री भारतात दाखल

सौदी अरेबियाचे उपपरराष्ट्रमंत्री अदैल अलिजुबैर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरघची गुरुवारी दिल्लीत पोहोचले. दोघांनीही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. पहलगाम हल्ला आणि भारत-पाकिस्तान तणाव यावर दीर्घ चर्चा केली. जेव्हा सौदी अरेबियाने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांना फोनवरून फटकारले. तेव्हा इराणने मध्यस्थी करण्याची ऑफर दिली. पण भारताने स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवत नाही, तोपर्यंत चर्चेचा काही अर्थ नाही.

ब्रेकिंग : भारत-पाकिस्तामधील तणावाचा विद्यार्थ्यांना फटका; CA ची मुख्य परिक्षा पुढे ढकलली

5. लष्करप्रमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी गुरुवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी लष्करप्रमुख पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. जनरल द्विवेदी यांनी पंतप्रधान मोदींना ताज्या घडामोडींची माहिती दिली. पंतप्रधान मोदींसोबत लष्करप्रमुखांची भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे, कारण बुधवारी रात्रीच पाकिस्तानने 15 भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, तो भारताने आपल्या S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने हाणून पाडला. यानंतर भारताने इस्रायली बनावटीच्या आत्मघातकी बॉम्बर HAROP ड्रोनने पाकिस्तानवर हल्ला केला, यामध्ये पाकिस्तानच्या अनेक संरक्षण यंत्रणा नष्ट झाल्या.

6. भारताचा पाकिस्तानला कडक इशारा

भारताने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. भारताने म्हटलंय की, जर पाकिस्तानने हल्ला केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. आम्ही प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, आमची कृती तणाव वाढवण्यासाठी नाही. तणाव वाढवण्यासाठी फक्त पाकिस्तानच जबाबदार आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेला हल्ला हा तणावाची सुरुवात होती. त्याला भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे रोजी प्रत्युत्तर दिले.

7. भारत-पाकिस्तानमधील तणावावर तुर्कीचे राष्ट्राध्यक्षांचे विधान

पाकिस्तानचे मित्र तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैयप एर्दोगन यांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षावर एक विधान केलंय. इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये, तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय की, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव एका प्राणघातक संघर्षात रूपांतरित होईल. ज्यामुळे क्षेपणास्त्र हल्ले होतील आणि अनेक नागरिकांचा मृत्यू होईल, काळजी वाटतेय. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, हल्ल्यात जीव गमावलेल्या आपल्या बांधवांसाठी प्रार्थना करतो. पाकिस्तानच्या राज्याप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.

8. पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 नष्ट केली

भारताने हेरोप ड्रोनने पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे. भारताने इस्रायलकडून हेरॉप ड्रोन खरेदी केलेत, तर पाकिस्तानने चीनकडून एचक्यू-9 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली होती. अशा परिस्थितीत, पाकिस्तानची भूमी आता परदेशी शस्त्रास्त्रांच्या चाचणी केंद्र बनली आहे. तथापि, HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली हेरोपपेक्षा खूपच महाग आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे हे नुकसान खूप मोठे मानले जात आहे.

9. पुलवामा आणि पठाणकोट हल्ल्यातील दहशतवादी ठार

बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पुलवामा आणि पठाणकोट हल्ल्यातील दहशतवादी ठार झाल्याची चर्चा सुरू आहे. पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याने अब्दुल रऊफ असगर मारला गेल्याची चर्चा सुरू आहे. असगर हा जैशचा प्रमुख मसूद अझहरचा धाकटा भाऊ आणि आयसी 814 अपहरण, पठाणकोट फिदाईन हल्ला आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.

10. लष्कराने नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी बंकर उद्ध्वस्त केले

पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या लष्कराने नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी बंकर उद्ध्वस्त केलेत. गुरुवारी रात्री पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारताने पूर्णपणे हाणून पाडला. भारतीय लष्कराने पाकिस्तानचे 50 ड्रोन नष्ट केले. जम्मू आणि काश्मीरमधील सांबा येथे बीएसएफने अनेक घुसखोरांना ठार मारले. भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे एक मोठे यश आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांबाबत भारतीय लष्कराने मोठे विधान जारी केले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube