CM Devendra Fadanvis Meet Raj Thackeray Today : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला का गेले आहेत? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर पुढे काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने आजची बैठक महत्वाची मानली (Maharashtra Politics) जातेय. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी या दोघांची बैठक पार पडली आहे.
दुसऱ्याच्या झेंड्यावर आम्ही पंढरपूर करत नाही; खासदार लंकेंचा आमदार दातेंवर निशाणा
मुख्यमंत्री फडणवीस अचानक राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा अन् विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकांचे वेध लागलेत. सर्वच पक्ष या निवडणुकांच्या तयारीला जुंपले आहेत. राज ठाकरेंच्या मनसेने देखील कंबर कसली आहे. आता ही भेट, त्याच पार्श्वभूमीवर असल्याचा राजकीय नेतेमंडळी कयास लावत आहेत.
तब्बल एक तास चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. शिवतीर्थ येथे दोघा नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि अत्यंत महत्वाची मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोघांच्या भेटीबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे.
महायुती सरकार मध्ये वेगवेगळ्या कारणाने नाराजी नाट्य समोर येत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेला शिंदे शिवसेना नाराज असल्याचे वारंवार दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेना पक्षावर दबाव आणण्याच्या उद्देशाने मनसेची भाजप जवळीक साधून खेळी करत असल्याचे बोलले जात आहे. देशात भाजपा, राज्यात भाजपा आणि मुंबई महापालिकेवर भाजपा झेंडा फडकविण्याचा मानस भाजपाचा असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेवरील वर्चस्वसाठी भाजपाच्या रननीतीचा एक भाग असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहे.
अमित ठाकरे विधानपरिषदेवर आमदार?
लोकसभा निवडणूकित मनसेने भाजपाला म्हणजेच महायुतीला पाठिंबा दिला होता, तर विधानसभा निवडणूकित मनसे स्वबळाबावर लढली. मात्र, मनसेला एकही आमदार निवडून आणता आला नाही, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना परभवाला सामोरे जावा लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी EVM वरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. अशातच अमित ठाकरे यांना भाजपा कोठ्यातून विधान परिषदेवर घेऊन मनसेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपा करू शकतो. अमित ठाकरे विधान परिषद आमदार होणार का, मनसे महायुती सोबत, अथवा भाजपा सोबत मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार का, मनसे मुंबई महापालिका स्वबळावर लढणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीबद्दल सूचना केल्यात. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झालेत. मात्र या भेटीमुळं आता राजकीय वर्तुळात अनेकांचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय. भाजप नेते मोहित कंबोज देखील या बैठकीला उपस्थित होते.
धक्कादायक! इन्स्टा स्टोरी ठेवल्यावरून झाला वाद, सख्ख्या भावांनी १७ वर्षाच्या मुलाची केली हत्या
मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सुद्धा वक्तव्य केलं होतं. राज ठाकरेंनी निकालावर संशय व्यक्त केला होता. आता पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे आजची फडणवीस अन् ठाकरेंची भेट महत्वाची मानली जातेय. या भेटीचं नेमकं कारण काय? आजच्या भेटीत काय चर्चा होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. फडणवीसांची राज ठाकरेंची भेट नियोजित नसल्याचं बोललं जातंय. त्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती समोर येतेय.