Download App

196 लोकांची चौकशी, 286 मोबाईल नंबरांची तपासणी; महादेव मुंडे प्रकरणी विधानसभेत CM फडणवीसांचा मोठा खुलासा

CM Devendra Fadnavis On Mahadev Munde Death Case : बीड (Beed Crime) जिल्ह्यातील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणावर (Mahadev Munde Death Case) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, या गुन्ह्याच्या तपासात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि पोलिसांनी सखोल तपास सुरू (CM Devendra Fadnavis) केला आहे.

286 मोबाईल नंबरची तपासणी

फडणवीस म्हणाले की, महादेव मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणाचा मोठ्या प्रमाणावर (Beed Crime) तपास सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आतापर्यंत 196 जणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये मयत व्यक्तीच्या आर्थिक देवाणघेवाणीविषयीही तपास केला जात आहे. या पार्श्वभूमीवर 286 मोबाईल नंबरची तपासणी करण्यात आली असून, 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे श्री क्षेत्र आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ चे आयोजन

मुख्यमंत्र्यांनी यावेळी परळीजवळील जंगलात झालेल्या या हल्ल्याविषयी अधिक माहिती दिली. “घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी सापडले नव्हते. मात्र दीड महिन्यांनंतर एका महिलेनं पोलिसांना माहिती दिली की, त्या दिवशी तिने दोन व्यक्तींमध्ये भांडण होताना पाहिलं होतं. तिची संपूर्ण चौकशी करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

सावधान: बुधवार पेठ ते घर… आयटी अभियंत्याचा पाठलाग करत बनवला व्हिडिओ

व्हिसेरा अहवालाचं विश्लेषण

फडणवीस यांनी हेही स्पष्ट केलं की, व्हिसेरा अहवालाचं विश्लेषण सुरू असून, तांत्रिक विश्लेषणाद्वारे अधिक डिटेल तपास केला जात आहे. जवळपास 150 मोबाईल नंबरच्या डम्प डेटाचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नीच्या भावना लक्षात घेत, त्यांचा आक्रोश आम्हाला समजतो. पण या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. आवश्यक त्या सर्व तपासाच्या दृष्टीने सरकार गंभीर असून भविष्यातही कठोर पावलं उचलली जातील, असं आश्वासन दिलं.

या वक्तव्यानंतर विरोधकांनी सरकारकडून लवकरात लवकर आरोपींना पकडून न्याय दिला जावा, अशी मागणी केली. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सध्या बीड पोलिसांकडून आणि विशेष पथकाकडून सुरू आहे.

 

follow us