Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad: आमदार निवासमधील (MLA residence) कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट जेवण दिल्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी थेट कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये गायकवाड यांनी राडा केल्याचा व्हिडीओही आता समोर आला. त्यांच्या या कृतीवर विधानपरिषदेत विरोधकांनी आक्षेप घेत निलंबनाची मागणी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील (Devendra Fadnavis) सभापतींनी कारवाई करावी, असं म्हटलं.
मोठी बातमी! तुकडे बंदी कायदा रद्द होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा
संजय गायकवाड यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद विधान परिषदेत देखील उमटले आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याबद्दल गायकवाड यांना निलंबित करण्याची मागणी केली. ते म्हणाले, एक माजलेला आमदार बनियन आणि लुंगीवर कॅन्टीमध्ये येऊन कर्मचाऱ्यांनी बॉक्सिंग करत मारतो. आमदारांनी कसं राहावं, याचे काही संकेत आहेत की, नाही.. तुम्ही कर्मचाऱ्यांना मारहाण करता. पण, जर तुमच्यात हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्यांना मारहाण करा. अशा आमदारांचा सरकारने बंदोबस्त करावा, त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी परब यांनी केली.
मोठी बातमी! राजस्थानमध्ये वायूसेनेच्या विमानाचा भीषण अपघात, बचाव कार्य सुरू
परब यांच्यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले, मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. तिथून माहिती आली की, भाजीला वास येत होता. आमदार निवासात काही चुकीच्या काही गोष्टी असतील तर त्यावर कारवाई करावी. परंतु लोकप्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. टॉवेल मारणं किंवा लुंगीवर मारणं असेल, मारणं चुकीचंचं आहे. यामुळे आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये जाते, ही निश्चितच गंभीर बाब आहे आणि यावर सभागृहातील अध्यक्षांनी याची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. जी काही कारवाई करायची असेल ती करण्यात यावी, असं फडणवीस म्हणाले.
प्रकरण काय?
काल (८ जुलै) रात्री आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रुममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र, जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळं होतं आणि त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार गायकवाड यांनी थेट कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. आणि कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली.
MLA Sanjay Gaikwad’s behaviour is inappropriate and creates a negative perception about all legislators among the public.
आ. संजय गायकवाड यांचे वर्तन भूषणावह नाही, यातून सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना जाते!
(विधानपरिषद, मुंबई | दि. 9 जुलै 2025)#Maharashtra… pic.twitter.com/Cp5JUp42wB
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 9, 2025