मोठी बातमी! राजस्थानमध्ये वायूसेनेच्या विमानाचा भीषण अपघात, बचाव कार्य सुरू

Plane accident in Rajasthan : गुजरात विमान दुर्घटनेची घटना ताजी असतानाच आता राजस्थानमधील चुरू येथे आज वायुसेनेचं एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. (Plane) हा अपघात रतनगड मधील भानूदा गावामध्ये घडला. विमानाच्या ढिगाऱ्यामध्ये एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह विमानाच्या पायलटचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राजस्थानातल्या रतनगड मधील भानूदा गावात हा भीषण अपघात घडला आहे. भारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं. स्थानिक लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांची एक टीम अपघातस्थळी दाखल झाली, पोलिसांकडून तातडीनं घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात झाली. मात्र, अद्याप तरी या विमानाच्या पायलट संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
हुश्श.. आणखी एक विमान अपघात टळला; पायलटचा Mayday मेसेज अन् विमानाचं लँडिंग
या अपघाताबाबत माहिती देताना स्थानिक नागरिकांना सांगितलं की, आकाशातून एक जळत असलेलं विमान खाली कोसळलं. हा अपघात इतका भीषण होता की, या विमानाचा मबला तब्बल दोनशे फूट परिसरात विखूरला गेला, विमानाचे पार्ट दूरवर उडाले आहेत.
या घटनेनंतर आतापर्यंत घटनास्थळी एक मृतदेह आढळून आला आहे. मात्र, जेव्हा अपघात झाला तेव्हा विमानात नक्की किती लोकं होते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. अपघाताच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं अपघातस्थळी गर्दी केली होती, या विमानामध्ये एक किंवा दोन लोक असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Rajasthan: IAF's Jaguar fighter jet crashes near Churu
Read @ANI Story | https://t.co/3gKaiSGrnp#IAF #Jaguarfighterjet #crash pic.twitter.com/EYsFixSMlc
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2025