Download App

40 पेक्षा अधिक जागा कुठून मागून जिंकणार का? शिंदेंनी अ‍ॅक्टिंग करुन सांगत खिल्लीच उडवली

Eknath Shinde On India Alliance : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यापासून देशासह राज्यातील विविध जिल्ह्यांत टप्प्यांमध्ये निवडणूका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Pm Narendra Modi) ‘अबकी बार चारसो पार’चा नारा देण्यात येत आहे. तर राज्यातील विरोधी पक्षांकडून महाराष्ट्रातील 48 पैकी 40 पेक्षा अधिक जागांवर विजय निश्चित असल्याचा दावा केला जात आहे. त्यावरच बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अ‍ॅक्टिंग करुन सांगत दाखवत विरोधी पक्षांची खिल्लीच उडवली आहे. आत्मविश्वास गमावलेला पक्ष 40 पेक्षा अधिक जागा कुठून मागून जिंकणार का? असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

‘मिसेज चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’चे एक वर्ष पूर्ण होताच अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “मी कृतज्ञतेने…”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्यावतीने भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. विशाखापट्टणमपासून सुरुवात झालेल्या या यात्रेचा काल मुंबईतील शिवतीर्थावर समारोप झाला. यावेळी जाहीर सभेत बोलताना इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीवर जोरदार हल्लाबोल चढवण्यात आला.

इंडिया आघाडीच्या सभेला अखिलेश यादवांची दांडी, निवेदन जारी सांगितलं अनुपस्थित राहण्याचं कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत विरोधकांच्या टीकेला जोरदा प्रत्युत्तर दिलं असल्याचं दिसून आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग होती, देशातील विविध राज्यांमधून जनतेने तडीपार करण्यात आलेले नेते या सभेसाठी आले होते. कालच्या सभेत विरोधकांच्या चेहऱ्यांवरुन विश्वास गमावल्याचं दिसून आलं, त्यामुळे आता विश्वास गमावलेले नेते 40 पेक्षा अधिक जागा कुठून मागून जिंकणार का? अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केलीयं. मुख्यमंत्री शिंदेंनी अॅक्टिंग करुन बोलताच उपस्थितांसह मुख्यमंत्री शिंदेदेखील खदखदून हसल्याचे दिसून आले होते.

मुंबईतील अनेक भागांत राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा फिरुन आली खरी पण ठाण्यात त्यांच्या रॅलीमध्ये काहीच गर्दी नव्हती. कोणीच कार्यकर्ते दिसून आलेले नाहीत. तुम्ही सर्वांनीच त्यांच्या रॅलीचे व्हिडिओ पाहिले असतीलच काही नेते तर मारामारी करत असल्याचं पाहायला मिळालं असल्याची टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कालच्या सभेतील भाषणात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचा व्यक्तिद्वेष दिसून येत होता. इंडिया आघाडीकडे ना नीती, ना नेता, ना अजेंडा, एवढंच नाहीतर पंतप्रधानपदाचा उमेदवारही नसल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीयं.

follow us