Download App

‘लाडकी बहीण योजने’त खोडा घालण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र

विरोधक लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.

Cm Eknath Shinde : विरोधक लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पादरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे. या योजनेवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

Commits Suicide : तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं संपवलं जीवन; प्रेम कर म्हणून रोज…

एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी नेहमीच खोडा घालण्याचा प्रयत्न केलायं. आमचं सरकार देणारं आहे घेणारं नाही. आम्ही देना बॅंक आहोत लेना बॅंक विरोधक आहेत. आज बहिणींना जे पैसे दिले त्यावरच आम्ही थांबणार नाही. सरकारची अर्थिक स्थिती मजबूत झाल्यानंतर पैसे वाढवणार आहोत. हे पैसे महिलंना व्यवसायिकाला उपयोगी पडतील, महिलांना लखपती बनवण्याचं आमचं स्वप्न असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलंय.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सत्याचा पंचनामा; जबरदस्त कल्ला होणार

तसेच राज्यातील सर्वच बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आहेत. राज्यातून अनेक जिल्ह्यातून लाडक्या बहिणी राख्या बांधायला आल्या आहेत त्यांचं मी स्वागत केलं. वर्षा बंगल्यावर येऊन लाडक्या बहिणींनी राखी पोर्णिमेचा उत्सव साजरा केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जे दीड हजार महिलन्याला देतो आहोत, त्याबद्दल बहिणींच्या मनात एक आनंद समाधान आहे. आम्ही परिवारासाठी हे पैसे खर्च करु व्यवसायाला गुंतवणूक करु असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आता हा पैसा अर्थव्यवस्थेत येऊन उलाढाल होईल, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

संजय गायकवाडांसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल, तलवारीने केक कापणं आलं अंगलट!

आता म्हणतात पैसे काढा…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही जाहीर केली तेव्हापासून विरोधक विरोध करीत आहेत. विरोधक या योजनेच्याविरोधात थेट कोर्टात गेले होते. पण ही योजना सुरुच राहिली आहे. आधी पैसे येणार नाहीत असं विरोधक सांगत होते आता या योजनेचे जमा झालेले पैसे लवकर काढून घ्या, असं विरोधक म्हणत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

follow us