Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सत्याचा पंचनामा; जबरदस्त कल्ला होणार

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सत्याचा पंचनामा; जबरदस्त कल्ला होणार

Bigg Boss Marathi New Season Day 23 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन दणक्यात सुरू आहे. (Bigg Boss Marathi New Season ) कार्यक्रमाच्या टीआरपीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi) आता चौथा आठवडा सुरू झाला असून आज टीम A आणि टीम B अशा दोन गटांमध्ये ‘सत्याचा पंचनामा’ होणार आहे. (Bigg Boss Marathi New Promo) ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य कधी खरं बोलतील आणि कधी काय कोणापासून लपवतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे ‘सत्याचा पंचनामा’मध्ये ते काय धमाका करणार हे पाहावे लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ,”आज होणार आहे सत्याचा पंचनामा”, असं म्हटलं जात आहे. तर ‘सत्याचा पंचनामा’मध्ये जान्हवी बसलेली असून ‘बिग बॉस म्हणत आहेत,”आपण या खेळात निक्की यांची सावली आहात. आपलं स्वत:चं असं अस्तित्व नाही”. त्यावर टीम B मधील सदस्य सहमती दर्शवतात.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात डीपी लावतोय आग

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात डीपी आग लावताना दिसत आहे. डीपी निक्कीच्या टीमला सांगतोय,”तुम्ही एखादी गोष्ट बोलता तेव्हा छोटा पुढारी मला ते येऊन सांगतोय. लहानसहान गोष्टी नकळत तो बोलून जातो. योगिता जाण्याआधी तिच्याजवळ येऊन तो बोलत होता,”ताई तू गेल्यावर मला कोणाचा आधार आहे”. त्यावर योगिता म्हणाली होती,”मी याला कधी जवळ केलंय”.

रितेश भाऊने सदस्यांना दिला मोठा धक्का

‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात निखिल दामले, योगिता चव्हाण, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार होती. ‘कलर्स मराठी’वरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणारी अंतरा अर्थात योगिताने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुसाट प्रवास करायला सुरुवात केली आणि लगेचच तिच्या प्रवासाला ब्रेक लागला. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ, सदस्यांसोबत जमवून घेण्यात ती कमी पडली. तर दुसरीकडे कलर्स मराठीच्या ‘रमा राघव’ या मालिकेत राघवच्या भूमिकेच्या माध्यमातून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडणारा निखिल दामले मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून प्रेक्षकांवर भुरळ पाडण्यात कमी पडला.

Bigg Boss Marathi: रितेश भाऊने सदस्यांना दिला मोठा धक्का; पार पडलं डबल एविक्शन

‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर पडल्यानंतर निखिल दामले म्हणाला, “घरातल्या माणसांमुळे घरावर प्रेम झालं होतं. खेळ उशिरा कळला… खेळ लवकर कळला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. इन्व्हेसमेंट बॉक्समध्ये असलेला 50 पॉईंटचा कॉईन डीपी दादाला देत मी त्याला नॉमिनी करत आहे. या घरातील सगळ्यांचा आपापला एक फ्लेवर आहे. फक्त तो फ्लेवर आपण मेन्टेंन ठेवूया आणि तो अजून वाढवूया.”

‘बिग बॉस मराठी’च्या प्रवासाबद्दल बोलताना योगिता म्हणाली, “आतमध्ये माझे जे मित्र-मैत्रिणी झाले होते त्यांचे पाणावलेले डोळे पाहून खूप त्रास झाला. माझ्या टीमसाठी मला आता टास्क खेळता येणार नाही याचं आता दु:ख आहे. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ मला कळलाच नाही. या घरात राहणं खूप कठीण आहे. इन्व्हेसमेंट बॉक्समध्ये असलेल्या 50 पॉईंटचा कॉईन आर्याला देत मी तिला नॉमिनी करतेय. माझ्यासारखे रडू नका, एकमेकांना पाठिंबा देत छान खेळा. मला ‘कलर्स मराठी’ने दिलेल्या संधीबद्दल आभार. खूप चांगला अनुभव मला मिळाला आहे”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube