Download App

‘सरकार पडणार म्हणणारे ज्योतिष थकले पण..,’; CM शिंदेंनी ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं

Cm Eknath Shinde : सरकार पडणार म्हणणारे ज्योतिष थकलेत पण सरकार पडलं मजबूत होत चाललं असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी विरोधकांना डिवचलं आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यात भाजप-शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर ठाकरे गटाकडून सरकार कोसळणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आणखीनच मजबूत होत चाललं असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला आहे. धर्मवीर 2 (Dharmveer 2)चित्रपट मुहूर्त सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.

राज्यातील 15 लाख भाविकांना श्रीराम दर्शनासाठी अयोध्येत नेणार, बावनकुळेंची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनेक ज्योतिष म्हणत होते की सरकार कोसळणार, अनेकदा तारीख पे तारीख सांगत होतं. पण ज्योतिष थकले आहेत, पण सरकार काही कोसळलं नाही, आणखीनच मजबूत होत चाललं असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

‘एमआयडीसीतील उद्योजकांना जिल्हाधिकाऱ्यांचा जाच…’, आमदार लंकेचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

आता ज्योतिषांकडून 31 डिसेंबर ही तारीख सरकार कोसळण्याची सांगण्यात येत आहे. पण कोणीही काहीही म्हंटलं तरीही आपल्या मागे दिघेसाहेब आहेत. आपण आपलं काम सुरु ठेवायचं असतं. स्वार्थीपणा सोडून मी राज्याला, समाजाला, देशाला काय देईल याचा आपण विचार करायला पाहिजे, असं टिप्पणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

कोयना-कृष्णेचा पाणी प्रश्न पेटला! कोयनेचा सातबारा देसाईंच्या नावावर नाही, संजयकाका पाटलांची सडकून टीका

दरम्यान, शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह बंड केला. बंडाच्या काही दिवस आधीच एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्या संघर्षावर आधारित धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतरच शिवसेनेत संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. 2022 साली धर्मवीर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाला भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला धर्मवीर या चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी आता धर्मवीर २ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडाच्या एक महिन्यापूर्वी धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यांचे अत्यंत विश्वासू सचिन जोशी यांची या चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका राहिली होती.

धर्मवीर पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या भागांत 2024 साली प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे करणार आहेत. आज ठाण्यातील कोलशेत परिसरात चित्रपट मुहूर्त सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

Tags

follow us