कोयना-कृष्णेचा पाणी प्रश्न पेटला! कोयनेचा सातबारा देसाईंच्या नावावर नाही, संजयकाका पाटलांची सडकून टीका
Koyna-Krishna : गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पाणी प्रश्न पेटला होता. त्यानंतर राज्य सरकारने जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले. हा पाणी प्रश्न सुटत नाही, तोच आता कोयना-कृष्णा पाणी प्रश्नावरून (Koyna-Krishna) सातारा आणि सांगली जिल्ह्यात चांगलचं वातावरण पेटलं. कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुतीमध्येही संघर्ष उफाळून आल्याचं दिसतं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर भाजपचे खासदार संजय काका पाटलांनी (Sanjay Kaka Patil) सडकून टीका करत राजीनामा देण्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय.
Rajasthan Election : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, काँग्रेस जादुई आकडा पार करेल, गेहलोतांचा दावा
काय म्हणाले संजय काका पाटील?
सांगलीसह कृष्णाकाठच्या गावांसाठी हक्काचे पाणी सोडण्यास विलंब करणाऱ्या साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या नावावर कोयनेचा सातबारा नाही. पाणी अडवून आमचा आत्मसन्माला ठेच लावण्याचा प्रकार खपवून घेणार नाही. मंत्री देसाईंची लुडबूड आणि उद्दामपणा खपवून घेतला जाणार नाही, असे खासदार संजय काका पाटील यांनी म्हटले. पाणी अडवण्याची भूमिका घेणार असाल तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देणार, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
यावेळी पुढे बोलताना संजय काका म्हणाले, सांगली जिल्ह्यातील लोकांना भीक मागितल्यासारखी परिस्थिती आणणं योग्य नाही. यावरून राजकारण केले जात आहे. या हंगामात कृष्णा नदी तीनदा कोरडी पडली. यामागे पालकमंत्री देसाई यांचा हात असल्याचे स्पष्ट होत असून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. कोयनेतून पाण्याचा विसर्ग करण्यात अडथळे आणले जात आहे. सांगली जिल्ह्याला प्रकल्प अहवालानुसार पाणी मिळावे, ही आमची भूमिका आहे, असं संजय काका पाटील म्हणाले.
कोचीनमधील टेक-फेस्टमध्ये चेंगराचेंगरी, चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गेले जीव
ते म्हणाले, प्रकल्प अहवालानुसार जिल्ह्याला 35 टीएमसी पाणी आहे, ते पाणी तेच पाणी देण्यास आडकाठी आणली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहोत, असे पाटील म्हणाले.
ते म्हणाले, वीज विकत घेता येईल, पाणी नाही. आमच्या पक्षासोबत सत्तेत असलेले लोक राजकारण करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही. पाण्या संदर्भातील सर्व अधिकार हे जलसंपदा मंत्र्याकडे असतात. मात्र, काहीजण राजकीय हस्तक्षेपाने जिल्ह्याच्या आत्मसन्माला ठेच पोहोचणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. कोयना धरण कुणाच्या मालकीचे आहे का? सांगली जिल्ह्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नाच्या बाबतीत शंभूराज देसाईंनी पडू नये, असेही संजय काका पाटील म्हणाले.