Download App

शरद पवारांच्या पुस्तकाचा दाखला देऊन CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं!

Cm Eknath Shinde : राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पीक हातातून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतलेलं कर्जही फेडता येणार नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱी सरकारकडे मदतीसाठी आस लावून बसला आहे. अशातच आज अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नूकसानीप्रश्नी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या पुस्तकाचा दाखला देत उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांना डिवचलं आहे.

मुंब्र्यातील बेकायदा शाखेची पुर्नबांधणीच अनधिकृत, सरकारी वरदहस्ताने…; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत शरद पवारांनी देखील पुस्तकात लिहिलं आहे. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून काम करणार आहे. मागील सरकारसारखं फसवणार नाही. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. म्हणूनच ते खालच्या पातळीवर जात टीका करीत आहेत. टीका करणं त्यांचा एककलमी कार्यक्रम असून जे घरात बसून, फेसबुक लाईव्ह करुन सूचना देत होते त्यांनी मला सांगू नये, असा खोचक सल्लाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नूकसानीची प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आणि मंत्र्यांच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे. युद्धपातळीवर पंचनामे करण्याचं काम सुरु असून राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा तालुक्यांचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं जास्त नूकसान झालं असेल त्यांच्या पाठीशी आम्ही उभे असल्याचा शब्दच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर पास झाली! लंडनमध्ये ‘या’ विषयात पूर्ण केलं मास्टर्स

शरद पवारांनी देखील उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीबाबत आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आहे. सरकार काम करणारं आहे. मागच्या सरकार सारखं फसवणारं नाही. दोन हेक्टरचे तीन हेक्टर करण्याचा निर्णय घेतलाय. एनडीआरफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पीकविमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला. केंद्र सरकारच्या सहा हजार मदतीमध्ये आम्ही आणखी सहा हजार देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम आम्ही करणार नाही. मागच्या सरकारचे निर्णय आम्ही पूर्ण केले आहेत. सर्व प्रकारची मदत सरकार करेल, असंही ते म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज