Download App

दुसऱ्यांच्या खिशात हात घालणे हाच ठाकरेंचा उद्योग; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात

Eknath Shinde : दुसऱ्याच्या खिशात घालणे हाच उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांचा उद्योग असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा आज जळगावातील मुक्ताईनगर भागात मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

चूक झाली म्हणता तर गुपचूप भेटून दहा-दहा वेळा निरोप का पाठवले? अमोल कोल्हेंचा खोचक सवाल

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तुम्ही दुसऱ्यांना काही देणारे कोण आहात, तुम्ही तर घेणारे होतात. दुसऱ्यांच्या खिशात हात घालण्याशिवाय तुमचा दिवस जात नव्हता, हाच तुमचा उद्योग आहे. आमदार जमा करेपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होता, मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे नको होता, त्याला तुम्ही काट्यासारखं बाजूला फेकून दिलं पण एकनाथ शिंदेला तुम्ही अजून ओळखलं नाही हा काटा नाही बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असल्याचा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

फिट असणं हे निरोगी असणं नाही, दहा हजार पावलं चालला तरी…; नितीन कामथच्या सहकाऱ्याची पोस्ट

तसेच मुख्यमंत्रिपदासाठी हापापलो नाही मी कधी. एक कार्यकर्ता म्हणूनच काम करीत आहे. माझ्यात कधीच मुख्यमंत्रिपदाची हवा गेलेली नाही मी काल आज आणि उद्याही जमिनीवरचा कार्यकर्ता असणार आहे. अडीच वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला. आधीच्या सरकारमध्ये सगळी कामे ठप्प होती. सगळं पॅरेलिसिस झाल्यासारखं सुरु होतं. सण उत्सवांवर बंदी केली होती. आपलं सरकार आल्यावर उत्सवांवर बंदी हटवली. आपलं सरकार आलं तेव्हा बंद पडलेल्या योजना सुरु केल्या, बाळासाहेबांना अपेक्षित सरकार स्थापन केलं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

हा एकनाथ शिंदे तुमच्यातला एक आहे. तुम्हाला कधीही भेटू शकतो. हा जमिनीवरचा कार्यकर्ता असून काल, आज आणि उद्याही कार्यकर्ता असेल म्हणून कोणीही मला येऊन भेटतात. लोक म्हणतात सीएम म्हणजे मुख्यमंत्री पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. मी फिल्डवर जाऊन काम करणारा माणूस आहे, घरात बसून आदेश देणारा हा मुख्यमंत्री नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

तसेच हे सरकारं फसवणारं नाही दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे. खोटी आश्वासने कधीच देणार नाही. आम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा आरक्षण देणार आहे. हा निर्णय आम्ही घेतला आणि शपथ पूर्ण केली आहे. या निर्णयामुळे आज पोलिस भरतीत मराठा मुलं उभं राहिली आहेत. तोंडाला पानं पुसणारं आमचं सरकार नाही पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त घोषणा केल्या होत्या, नंतर आम्ही पैसे दिले आहेत. जे बोलेल ते करणारं सरकार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

follow us