फिट असणं हे निरोगी असणं नाही, दहा हजार पावलं चालला तरी…; नितीन कामथच्या सहकाऱ्याची पोस्ट

फिट असणं हे निरोगी असणं नाही, दहा हजार पावलं चालला तरी…; नितीन कामथच्या सहकाऱ्याची पोस्ट

Dilip Kumar Post : हल्लीचं युग हे धकाधकीचं अन् धावपळ करण्याचं आहे. अनेकांना कामाच्या वेळा सांभाळून व्यायाम (Exercise) करायला शक्य होत नाही. पण एक वाक्य तुम्ही नेहमीच ऐकलं असेल, ते म्हणजे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फिट राहा आणि फिट राहण्यासाठी व्यायाम करा… पण, आता झिरोधाचे सीईओ नितीन कामथ (Nitin Kamath) यांचे सहकारी दिलीप कुमार एक पोस्ट लिहीली. त्यात फिट असणे हे निरोगी असणं नाही, असं म्हणत त्यांनी अनेकांची समजूत खोडून काढली.

Israel Hamas War : गाझातील लोकांची हेळसांड थांबवा; कमला हॅरिस यांची युद्धविरामाची मागणी 

त्याचं झालं असं की, काही दिसांपूर्वीच नितीन कामथ यांना हृदयविकाराचा झटका आला होता. याची माहिती खुद्द कामथ यांनी आपल्या सोशल मीडियावरून दिली. कमी झोप, थकवा, पाण्याची कमतता अन् कामाचा अतिरिक्त ताण यामुळं हा हृदयविकाराचा झटका आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता कामथ यांच्या तब्येतीत सुधारणा होतेय. ते पूर्ण बरे होण्यासाठी तीन ते सहा महिने लागू शकतात, अशी माहिती आहे. खरंतर कामथ हे आरोग्याविषयी सजग आहेत. ते फिटनेस उत्साही म्हणून ओळखे जातात. अनेकदा ते त्यांचे वर्कआउट फोटो शेअर करत असत असतात. हाच धागा पकडून दिलीप कुमार यांनी एक पोस्ट लिहिली.

नवनीत राणांना केवळ आमंत्रण पण, त्यांचा पक्षप्रवेश नाही; चर्चांना बावनकुळेंचा फुलस्टॉप 

दिलीप कुमार यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, मी नितीनसोबत जवळून काम करतो. आम्ही वर्कआउट्स आणि रेस एकत्र केल्या आहेत. सोशल मीडियावर नितीन ओळखणाऱ्यांपेक्षी मी त्याला जास्त ओळखतो. नितीन आरोग्याविषयी जागृक आहे, पण तंदुरुस्त असणे हे निरोगी असण्यासारखे नाही. अनकेजण असं समजात की, तंदुरुस्त आहोत, म्हणजे निरोगी आहोत. पण, तसं नाही. ते निरोगी आणि तंदुरुस्त हे समानार्थी नाहीत. त्या आरोग्याच्या वेगळ्या अवस्था आहेत.

पुढं कुमार यांनी लिहिलं की, तंदुरुस्त असणे म्हणजे सहनशक्ती, तग धरण्याची क्षमता, सामर्थ्य, लवचिकता, शक्ती आणि वेग यासारख्या शारीरिक क्रिया करण्याची तुमची तुमची क्षमता. तर निरोगी असणे ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था आहे.

खेळाडू किंवा सेलिब्रिटी हे आरोग्य आणि तंदुरुस्तीचे प्रतीक आहेत हा गैरसमज त्यानी खोडून काढला आहे. ते म्हणाले, आपण अनेकदा ॲथलीट्स किंवा सिनेस्टार्सकडे तंदुरुस्त आणि निरोगी म्हणून पाहतो. पण अनेकदा ते नसतात.

तुम्ही धावपटू असाल, नियमितपणे जिममध्ये जा किंवा दिवसाला दहा हजापर पावले चालला तरी तुमची तंदुरुस्ती आरोग्याची हमी देत नाही. तंदुरूस्त असणं गरजेच आहे. परंतु तरीही खराब पोषण, तणाव, झोपेचा अभाव यामुळं आरोग्याच्या समस्या येतात.  व्यायामशाळेत जाणे किंवा धावणे यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येत नाही. पण जास्त करण्यानं हृदयविकार होता. त्यामुळे सर्व काही योग्य प्रमाणात करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज