सनी देओलची रद्द झालेली नोटीस अन् नितीन देसाईंची आत्महत्या : मराठी माणसाने हे विसरता कामा नये!

सनी देओलची रद्द झालेली नोटीस अन् नितीन देसाईंची आत्महत्या : मराठी माणसाने हे विसरता कामा नये!

मुंबई : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर सुरु झालेले आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अद्याप कायम आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. ज्याप्रमाणे भाजपचे खासदार सनी देओल यांची कर्ज वसुलीची नोटीस 24 तासांच्या आत रद्द झाली आणि त्यांना अभय मिळाले, तसेच नितीन देसाई भाजपमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते असं राऊत म्हणाले. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) MP Sanjay Raut criticizes BJP over Nitin Desai’s suicide)

सामना वृत्तपत्रातील रोक-ठोक या सदरातून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपचे खासदार व अभिनेते सनी देओल यांनी बँकांचे 56 कोटींचे कर्ज थकवले. त्यामुळे त्यांच्या जुहू येथील बंगला लिलावासाठी काढण्यात आला. पण बँकेने चोवीस तासांत तांत्रिक कारण देत हा लिलाव रद्द केला. त्याआधी पंधरा दिवसांपूर्वी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आत्महत्या करावी लागली. बँकांचे कर्ज डोक्यावर असल्याने त्यांच्या ‘एनडी’ स्टुडिओवर जप्तीची कारवाई सुरू झाली. त्या धक्क्यातून देसाई यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला.

मुघलांचे गुलाम आज महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवत आहेत : लव्ह जिहादवरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

कर्ज बुडवणाऱ्यांना अभय दिले जाते, पण ते भारतीय जनता पक्षाच्या आतल्या गोटातील असतील तर. नितीन देसाईंचे प्राणही वाचवता आले असते. राहुल गांधी हे सरकारच्या आर्थिक घोटाळ्यांवर मोदी सरकारला प्रश्न विचारतात तेव्हा सरकार निरुत्तर होत असते. गांधी यांनी लोकसभेत 2020 साली देशातील 50 प्रमुख ‘विलफुल डिफाल्टर्स’ म्हणजे कर्ज बुडव्यांबाबत प्रश्न विचारले, पण सरकारने उत्तर देण्यास नकार दिला, असा हल्लाबोल करत जो न्याय देओल यांना मिळाला तो नितीन देसाई यांना का नाही? असा सवाल राऊत यांनी केला.

हे मराठी माणसाने विसरता कामा नये :

साकेत गोखले यांनी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेकडून कर्जबुडव्यांचा तपशील मागितला. त्यानुसार 50 कंपन्या आणि व्यक्तींची यादी देण्यात आली. जैन इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला 1 हजार 73 कोटींची कर्जमाफी देण्यात आली. शिवाय इतर 50 कंपन्यांची हजारो कोटींची कर्जे माफ केली. एकेका कंपनीचे किमान 500 कोटींचे कर्ज माफ करून जणू मलिदाच वाटला.

अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा; संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

या सर्व कंपन्या आणि त्यांचे मालक, भागीदार हे भाजपच्या नात्यागोत्यातील आहेत, पण नितीन देसाई यांना शंभर-सव्वाशे कोटींसाठी आत्महत्या करावी लागली. रिझर्व्ह बँकेला वेठीस धरून आपापल्या लोकांची हजारो कोटींची कर्जे माफ करायची व एखादा मराठी नितीन देसाई आत्महत्येस प्रवृत्त करायचा. हे सर्व सुरूच आहे. मराठी माणसाने हे विसरता कामा नये, असेही राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube