Ajit Pawar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बनावट सही आणि शिक्का प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नसल्याची तंबीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची सही आणि बनावट शिक्क्याची निवदेने समोर आल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचं सांगितलं आहे.
वायकरांसह अन्य दोन नेते ‘या’ दिवशी शिवसेनेत प्रवेश करणार; संतोष बांगरांचा गौप्यस्फोट
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनावट सही शिक्के प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसेभत दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहेत. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली असल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये ‘हायव्होल्टेज ड्रामा’ : 6 आमदारांनी सोडली काँग्रेसची साथ, CM सुख्खूंचा राजीनामा
तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दांत भूमिका मांडली आहे.