Cm Eknath Shinde News : राज्यातील जनतेला न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून आम्ही विरोधकांना आमच्या कामानेच उत्तर देणार असल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पानंतर विरोधकांकडून सत्ताधारी सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. याच टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सखोल चौकशी करा : विधानसभा अध्यक्षांचे गृहविभागाला निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळेच ते टीका करत आहेत. आम्ही त्यांना आमच्या कामाने उत्तर देणार आहोत, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
भाजपचे प्रदीप कंद राष्ट्रवादीच्या वाटेवर : अमोल कोल्हेंविरोधात अजितदादांचा जुन्या शिलेदार मैदानात ?
तसेच राज्यातील सर्वांना न्याय देणारा, सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सरकारने मांडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला पुरक असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात दुर्बल घटक, महिला शेतकरी, कामगार, तरुण आणि ज्येष्ठांचा समावेश आहे. जे राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये पुढे असते, त्या राज्याची मोठ्या प्रमाणात प्रगती होते. त्यामुळेच राज्यातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील ग्रामीण, शहरी रस्ते, रेल्वे, एअर कनेक्टिव्हिटीसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील महिलांसाठी महिला सक्षमीकरण योजना, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, लेक लाडकी, लखपती दीदी, बचत गट सक्षमीकरण, अशा विविध योजनांना प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागात मोठी तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, दुष्काळग्रस्त भागासाठीही मोठ्या प्रमाणात तरतुद आहे. उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हप्ते जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
शेतकऱ्यांना दुष्काळ, अवकाळी पावसाचा जसा फटका बसलायं तसाच फटका या अंतरिम अर्थसंकल्पाच्या घोषणांमुळे बसत आहे. राज्य सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही. राज्यात महायुती सरकारकडून अनेक घोटाळे केले जात आहेत. त्यापैकी मुंबईत रस्ते घोटाळा, यासोबतच आणखीनही घोटाळे आहेत. आधीच्या टेंडरमधला भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढतो सांगून टेंडर काढल्यावर पुन्हा नव्याने टेंडर पास करीत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महायुतीच्या सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचे कंत्राटदार मित्र जोमात अन् शेतकरी कोमात असल्याचीच परिस्थिती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.