Download App

‘मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून हॅट्रिक करणार’; CM शिंदेंनी व्यक्त केला निर्धार

Cm Eknath Shinde : मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून हॅट्रिक करणार’ असल्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील विविध विकासकामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये आज जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

अजितदादांसारखी फसवणूक होऊ नये म्हणून सांभाळून राहा; विखेंचा रोहितदादांना खोचक सल्ला

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मोदी एक नाव नाहीतर राष्ट्रभक्ती आहेत. मोदी म्हणजे विकास आणि यशाचा मंत्र आहेत. मागील चार दिवसांपासून मोदींच्या नेतृत्वाखाली विकासकामांसह राज्यातील विविध कामांचं लोकार्पण होत आहे, मोदींचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे, त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे, महाराष्ट्राच्या भूमीत मोदींच स्वागत करीत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

हिंमत दाखवा अन् निवडणूक लढवा नाहीतर निजामी मराठा..; आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला

तसचे मोदी देशाच्या सुवर्णकाळातले शिल्पकार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींबद्ल गौरवोद्गगार काढले आहेत. तसेच देशातील महिलांना नमो महिला सक्षमीकरण योजनेचा 55 लाख लाभ मिळाला आहे. मोदींच्या योजनेमुळे महिलांच्या जीवनात क्रांती घडत आहे. इंडिया फर्स्ट हा मोदींचा अजेंडा असून मागील 10 वर्षांत मोदींनी एकदाही सुट्टी घेतलेली नाही, त्यांनी जीवन अर्पण केलं आहे “अब घर घर मोदी नही मन मन मोदी” असा नाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

दरम्यान, देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीवर विश्वास असून पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून हॅट्रिक करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे.

follow us