हिंमत दाखवा अन् निवडणूक लढवा नाहीतर निजामी मराठा..; आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला
Prakash Ambedkar : जरांगे पाटील हि्ंमत दाखवा अन् निवडणूक लढवा नाहीतर निजामी मराठा तुम्हाला संपवणार असल्याचा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या सभा पार पडत आहेत. पुण्यात आज सभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते.
मोठी बातमी! इंडिया आघाडीतील जागावाटपानंतर AAP ने जाहीर केले उमेदवार
आंबेडकर म्हणाले, आत्ता आंदोलन जर जिरवायचा नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही आणि इलेक्शनमध्ये उभे राहायचं नसेल तर इथले निजामी मराठे तुम्हाला कसं संपवतात हे तुम्हाला देखील कळणार नाही. नवीन मित्र शोधावा लागेल इथला नवीन मित्र मुसलमानाशिवाय दुसरा कोणी नाही हे लक्षात घ्या. मुस्लिम समाजाला सांगतो राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षा देणार नाही, तुम्ही या वंचिताच्या चळवळीत सहभागी झालात तिथेच तुम्हाला सुरेक्षा मिळेल. जरांगे पाटील हिंमत दाखवा अन् निवडणूक लढवा नाहीतर निजामी मराठा संपवेल. हा निजामी मराठा काँग्रेसमध्ये आहे आणि भाजपकडे देखील आहे. ओबीसीचा मिळालेलं ताट जर अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला राजकीय समझोता करावा लागेल, असं आंबेडकर म्हणाले आहेत.
‘खासदार निवडून दिला नाही तर विधानसभा लढणार नाही’, अजित पवारांचा बारामतीकरांना फायनल इशारा
तसेच मी ओबीसीना नेहमी विचारतो तुमचं आणि मुस्लिमांच भांडण काय? ना तुम्ही राजेमहाराजे नव्हता ना दरबारी नव्हता, ना चोपदार नव्हता छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ सोडला तर इथले सवर्ण आणि मुस्लिमांच राजकीय भांडण समजू शकतो कारण त्यांना मुस्लिमांना 800 वर्ष गुलाम करायचं आहे. कारण मुस्लिमांनी त्यांच्यावर 800 वर्ष राज्य केलं आहे. लोकसभेच्या 48 जागा जिंकायचा असेल तर ओबीसी विरुद्ध मुस्लिम हा भेद मिटवावा लागणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. जिथे ओबीसीचा उमेदवार उभा असेल तिथे त्याला मतदान करून निवडून आणा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इलेक्शनच्या तारखा जाहीर होतील. आपल्यासमोरच लक्ष उघड आहे केंद्रामध्ये पुन्हा एकदा आरएसएस आणि भाजप याचा सरकार येणार नाही याची दक्षता घ्यावी. सत्ता मिळवण्यासाठी पक्ष फोडण्याचा काम सुरू असून आमदार पळवण्याचा काम सुरू आहे. मात्र, मतदाराने दाखवून द्यावं आम्हीच खरे राजे आहोत. उद्या युती होईल ना होईल हे सांगता येत नाही मात्र युती व्हावी अशी आपली इच्छा आहे. वर मोदी रिंग मास्टर बसलेला आहे तो उद्या त्याला जेलमध्ये टाकेन म्हणतात मग हा म्हणतो जेलमध्ये टाकू नकोस मी तुझ्याचं जेलमध्ये येतो, अशी टीकाही त्यांनी केलीयं.