Nana Patole News : राज्यात पहिल्यांदाच आंदोलनकर्त्यांची एसआयटी चौकशी होत असल्याचं म्हणत काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, देशातील इतर राज्यांत आंदोलनकर्त्यांवर होत असलेल्या कारवायांवरुन नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं सुरु असलेल्या आंदोलनावरुन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले आहेत.
रसिकलाल धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त शिष्यवृत्ती वितरण अन् रक्तदान शिबीराचे आयोजन
नाना पटोले म्हणाले, राज्य सरकारकडून अर्थसंकल्प सादर करीत असताना अनेक मोर्चे राज्यात सुरु आहेत. पेन्शनरचा जुन्या पेन्शनसाठी मोर्चा, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचा संप, धनगर समाजाचा मोर्चा, असे विषय प्रलंबित आहेत. आता सरकारकडून
धमकावलं जातंय, मारलं जातंय हे राज्यात पहिल्यांदाच असं झालं असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
फडणवीस आणि माझ्यात भांडण लावू नका.. तसे होणार नाही : CM शिंदेंनी विरोधकांना ठणकावले
तसेच मागील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी मनोज जरांगे यांच्या संपर्कात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यावेळी राज्य पेटलं होतं. जाळपोळ सुरु होती तेव्हा राज्याचं गृहखातं झोपलं होतं का? देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीच नाना पटोले यांनी केली आहे.
माजी आमदाराच्या हत्येसाठी सिद्धू मुसेवाला पॅटर्न; भाजपच्या माजी आमदाराचा हात !
दरम्यान, राज्यावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे. अर्थसंकल्पात एक लाख वित्तीय तूट पाहण्यात आलीयं. कर्ज घेऊन चालवण्याची जी पद्धत आहे ती राज्याला डुबवणारी आहे. राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करुन जनतेला झोपवण्याचा प्रकार सुरु असून अजूनही कर्ज घेण्याची बाकी असल्याचं ते म्हणतात. आता सरकारचा खरा चेहरा निवडणुकीत जनतेसमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.