फडणवीस आणि माझ्यात भांडण लावू नका.. तसे होणार नाही : CM शिंदेंनी विरोधकांना ठणकावले

फडणवीस आणि माझ्यात भांडण लावू नका.. तसे होणार नाही : CM शिंदेंनी विरोधकांना ठणकावले

Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन प्रामाणिकपणे होतं त्यावेळी तिथं सगळं मंत्री गेले, सगळे अधिकारी गेले. पण, कुठेतरी माणसाने कायद्याच्या चौकटीत जे बसणार नाही त्याची मागणी करणं हे योग्य आहे का. आता अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांबाबत ते बोलत नाही तर त्यांच्याबाबतीत (देवेंद्र फडणवीस) बोलतात पण काळजी करू नका आमच्यात काही दुफळी होणार नाही. कारण, माझ्याबद्दलही जरांगे पाटील बोलले आहेत. नसतील बोलले तरीसुद्धा सरकार म्हणून आमची काही जबाबदारी आहे.

आता मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून जी भाषा येत आहे. ती कुणाची भाषा आहे हे विचारले जाणार नाही का. ही सगळी कुणाची स्ट्रॅटेजी आहे. एकावर आरोप करायचे एकाला सेफ ठेवायचं. आमच्या सरकारमध्ये घेतलेले निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्र्यांना विचारून घेतले जात आहेत. हा राज्याचा संवेदनशील विषय आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते आता मिळत आहेत. जे काही समाजाला मिळत नव्हतं ते आता मिळत आहे याचं स्वागत केलं पाहिजे. आरक्षण कसं टिकेल याबाबत आता बोललं पाहिजे.

कायदा सगळ्यांना समान. कायद्यापेक्षा कुणीच मोठा नाही. कायद्याचं उल्लंघन कुणालाच करता येणार नाही. पंतप्रधान मोदींवर टीका केली जाते. माझ्यावरही खालच्या पातळीची टीका झाली. जरांगेंची भाषा राजकीय आहे. हे करा, ते करा, हे गाव बंद ही काय भाषा आहे का? असं आपल्याकडे कधी झालं होतं का आपल्याकडे. असं कधीच झालं नव्हतं. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून वागलं पाहिजे, असेही शिंदे यांनी ठणकावले.

Manoj Jarange : ‘चौकशा करा, मी सुद्धा आता सगळं उघड करतो’ SIT चौकशीवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

मनोज जरांगेंच्या तोंडी राजकीय भाषा 

देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सारथी सुरू झाले. अण्णासाहेब आर्थिक विकास महामडंळाला निधी दिला. शहरी भागात निर्वाह भत्ता वाढवला. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती दिल्या. मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे समाजासाठी आंदोलन करत होते. तेव्हा मी एकदा नाही तर दोनदा उपोषणस्थळी गेलो. परंतु, सरकारवर टीका करणं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचीही काढली. फडणवीसांवर खालच्या पातळीवर आरोप केले. ही भाषा कार्यकर्त्यांची नाही तर राजकीय पक्षाची आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज