रसिकलाल धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त शिष्यवृत्ती वितरण अन् रक्तदान शिबीराचे आयोजन

  • Written By: Published:
रसिकलाल धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त शिष्यवृत्ती वितरण अन् रक्तदान शिबीराचे आयोजन

पुणे : ज्येष्ठ उद्योगपती आणि माणिकचंद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रसिकलाल माणिकचंद धारीवाल (Rasiklal Dhariwal) यांच्या जयंतीनिमित्त (दि.1 मार्च) शिष्यवृत्ती वितरण आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती RMD फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारीवाल यांनी दिली आहे. (RMD Group Founder Rasiklal Dhariwal Birth Anniversary)

गुरुजी तालिम टायटन्स, रंगारी रॉयल्स्, साई पॉवर हिटर्स विजयी; पुनित बालन ग्रुप ‘फ्रेंडशिप’ क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन

रसिकलाल धारीवाल यांनी नेहमीच आर.एम.डी. फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी विविध योजनांसह विविध कार्यक्रम राबवत असत. यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, शाळा महाविद्यालयाची उभारणी गरिब रुग्णांना आर्थिक मदत आदी उपक्रम राबवले जात असत. ही परंपरा कायम ठेवत यावर्षीदेखील रसिकलाल धारीवाल याच्या जयंतीनिमित्त येत्या 1 मार्च 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एम.बी.बी.एस.,आयुर्वेद, डेंटल सर्जन, फिजिओथेरपी, नर्सिंग, पॅरामेडिकल आणि पॅथॉलॉजी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विविध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे.

‘पुनीत बालन ग्रुप’कडून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ३१ संगणकांची भेट

रक्तदान शिबीराचे आयोजन

शिष्यवृती धनादेश वाटपासह दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील रक्तदान शिबीराचे (Blood Donation) आयोजन करण्यात आले आहे. कोरेगाव पार्क येथील माणिकचंद हाऊस बंगला नं. 64 लेन नं. 3 येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, 1 मार्च 2024 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास पुणे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान करावे, असे आवाहन RMD फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारीवाल यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube