Haryana Assembly Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत एकसंघ राहून इंडिया आघाडीने (INDIA Alliance) भाजपला जोरदार धक्का दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला स्वतःच्या बळावर बहुमत मिळवता आलं नाही. काँग्रेसला 99 जागांवर (Congress Party) यश मिळाल्याने आघाडीत पक्षाचं वजन वाढलं आहे. असे असले तरी या आघाडीत काही पक्षांच्या वेगळ्या वाटा दिसू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर दिल्ली आणि पंजाब मधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने काँग्रेसला पहिला धक्का दिला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुका (Haryana Assembly Elections) स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षाने केली. इतकेच नाही तर पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी प्रचार मोहिमेला सुद्धा सुरुवात करण्यात आली.
या निमित्तानं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी (Bhagwant Mann) हरयाणा विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढू असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितलं की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हरयाणाचेच रहिवासी आहेत. आम् आदमी पार्टीच्या या निर्णयाने आता हरयाणाच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. यंदा निवडणुका तिरंगी होऊ शकतात. राज्यात यंदा ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीचे संघटन महामंत्री संदीप पाठक यांनी सांगितले की राज्यात सरकार स्थापन करण्यासाठीच आम्ही मैदानात उतरणार आहोत. 20 जुलै रोजी मोठा कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांची गॅरंटी लॉन्च करणार आहोत.
छोटा भाऊ होणार की वादाचा नवा अंक सुरू करणार? चीन मित्र ‘ओलीं’च्या हाती नेपाळचं पॉलिटिक्स
लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस यांची आघाडी होती. दिल्ली, हरयाणा आणि गुजरातसाठी ही आघाडी होती. परंतु हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. दिल्ली आणि गुजरातमध्ये या आघाडीला जोरदार धक्का बसला. दिल्लीतील सात जागांपैकी काँग्रेसने चार आणि आपने तीन जागांवर उमेदवार दिले होते. येथे दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. गुजरातमध्ये काँग्रेसने 26 आणि (Gujarat News) आपने एका जागेवर उमेदवार दिला होता. काँग्रेसने फक्त (Congress) एक जागेवर विजय मिळवला परंतु आम आदमी पक्षाला भोपळाही फोडता आला नाही.
हरयाणात काँग्रेसने आपला एक जागा दिली होती आणि स्वतः नऊ जागांवर उमेदवार दिले होते. काँग्रेसचा हा डाव कमालीचा यशस्वी ठरला. नऊ पैकी पाच उमेदवारांनी विजय मिळवला. पण आम आदमी पार्टीचं येथेही पानिपत झालं. एक जागा मिळाली होती तिथेही काही करता आलं नाही. कुरुक्षेत्र मतदारसंघात आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला.
लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसला हरयाणातील 90 विधानसभा मदारसंघापैकी 46 मतदासंघात आघाडी मिळाली होती. तर भाजपला 44 मतदारसंघात आघाडी मिळाली होती. हरयाणातील परिस्थिती अनुकूल बनत असल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आम आदमी पार्टीने स्पष्ट सांगितलं होते की विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. या नुसारच पक्षाच्या नेत्यांनी आजचा निर्णय जाहीर केला आहे.
तसेच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही आप आणि काँग्रेस आघाडी लोकसभा निवडणुकी पुरतीच होती असे 4 जुलैला सांगितले होते. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षात आघाडी होईल याची शक्यता कमीच आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. दिल्लीत काँग्रेसच्या (Delhi) तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी आरोप केला होता की त्यांना आम आदमी पक्षाची मते मिळाली नाहीत. खरं तर तेव्हा पासूनच असे संकेत मिळत होते की ही आघाडी फार काळ टिकणार नाही. दुसरीकडे आम आदमी पक्षाचे हरयाणा उपाध्यक्ष अनुराग ढांडा यांनीही काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते.
मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर क्रॅश, विमानसेवा ठप्प; मुरलीधर मोहोळ झाले अॅक्टिव्ह
सन 2019 मधील विधानसभा निवडणुकीत आपने 90 पैकी 46 मतदारसंघात उमेदवार दिले होते. पण या सर्वच उमेदवारांचे डीपॉझिट जप्त झाले होते. या सर्व मतदासंघात मिळून पक्षाला 60 हजार मते मिळाली होती. काँग्रेसने सर्व 90 मतदारसंघात उमेदवार दिले होते. यातील 31 मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला होता. काँग्रेसला एकूण 28.8 टक्के मते मिळाली होती. म्हणजेच आम आदमी पार्टीच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली होती. यानंतर झालेल्या पोट निवडणुकीतही आम आदमी पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.