छोटा भाऊ होणार की वादाचा नवा अंक सुरू करणार? चीन मित्र ‘ओलीं’च्या हाती नेपाळचं पॉलिटिक्स

छोटा भाऊ होणार की वादाचा नवा अंक सुरू करणार? चीन मित्र ‘ओलीं’च्या हाती नेपाळचं पॉलिटिक्स

India Nepal Relations after Oli becomes Prime Minister : पुष्प कमल दहल यांचं सरकार कोसळल्यानंतर भारताचे (India Nepal Relations) कट्टर विरोधक आणि चीनचे मित्र केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी पुन्हा पंतप्रधानपद काबीज केले आहे. ओली यांनी चौथ्यांदा नेपाळचे पंतप्रधान (Nepal New Prime Minister) म्हणून शपथ घेतली आहे. ओली चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी पुन्हा देशाचा कारभार हाती घेतला आहे. अशा परिस्थितीत त्यांची ही टर्म भारतासाठी कशी राहील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ओली यांना जागतिक राजकारणात चीन समर्थक म्हणूनच (China) ओळखले जाते. पंतप्रधान बनल्यानंतर मात्र त्यांची वक्तव्ये या ओळखीच्या विपरीत येत आहेत. त्यामुळे ओली आता आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत का? याची चर्चा राजकारणात सुरू झाली आहे. नेपाळच्या राजकारणाला राजकीय षडयंत्रांचा इतिहास आहे. आताही याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. दोन दिग्गज नेत्यांच्या हातमिळवणीनंतर ओली पंतप्रधान बनले आहेत. 21 महिन्यानंतर नेपाळी काँग्रेसचे नेते शेर बहादूर देऊबा पंतप्रधान होतील. याआधी ओली यांनी पीके दहल प्रचंड यांच्या बरोबरील चार महिन्यांपासून सुरू असलेली आघाडी तोडून टाकली. विरोधी नेपाळी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करत सरकार स्थापन केले.

नेपाळमध्ये कहर; मुसळधार पावसामुळे त्रिशूली नदीत दोन बस वाहून गेल्या, 65 जण बेपत्ता

भारता बरोबरील संबंध कसे बिघडले?

केपी शर्मा ओली ज्यावेळी सन 2015 मध्ये नेपाळचे पंतप्रधान बनले त्यावेळी सुरुवातीच्या काळात दोन्ही देशांतील संबंध चांगले होते. नंतर मात्र या संबंधात कटुता वाढत गेली. ओली यांच्याच काळात भारताने सहा महिने आर्थिक नाकेबंदी केली होती. दुसरीकडे ओली यांनीही भारतावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी चीनला प्राधान्य दिले. नंतर मात्र ओली यांनी आपली चीन समर्थक अशी प्रतिमा मीडियाने निर्माण केली होती याचा सत्यतेशी काहीच सबंध नाही असे स्पष्ट करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

अयोध्या वादातही (Ayodhya) ओली यांनी भारतीयांना दुखावण्याचं काम केलं. जुलै 2020 मध्ये ओली म्हणाले होते की खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच नेपाळच्या विदेश मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले होते.

प्रेसिडन्शियल डिबेट काय? कशी होते राष्ट्राध्यक्षांची निवड? जाणून घ्या, अमेरिकेतील इलेक्शन ए टू झेड..

पीएम ओलींचे सूर का बदलले ?

आता ओली यांचे सूर बदललेले दिसतात. ओली यांनी नेपाळच्या तटस्थ नीतीचे संकेत एका वक्तव्यातून दिले होते. तसेच त्यांनी असेही स्पष्ट केले होते की कुण्या देशाला दुसऱ्या देशाविरुद्ध काही करण्यासाठी नेपाळचा वापर करू दिला जाणार नाही. आता त्यांच्या या वक्तव्याचा विचार केला तर भारतविरोधी शिक्का पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. परंतु चीन समर्थक म्हणून त्यांची ओळख असल्याने या नव्या वक्तव्यावर फारसा विश्वास ठेवता येत नाही. आगामी काळात ओली काय निर्णय घेतात यावरच सारे काही अवलंबून राहणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube