देशातील सर्वच राजभवन भाजपचे हेडऑफिस बनलेत; भगवंत मान यांचा हल्लाबोल

देशातील सर्वच राजभवन भाजपचे हेडऑफिस बनलेत; भगवंत मान यांचा हल्लाबोल

Bhagwant Mann On BJP : दिल्ली सरकार (Delhi Govt)आणि नायब राज्यपाल (Deputy Governor)यांच्यातील वादाच्या बातम्या सातत्यानं चर्चेत येत आहेत. नोकरशहांच्या बदल्या-पोस्टिंगचे अधिकार नायब राज्यपालांना देण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीत प्रचंड गदारोळ सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)आता विरोधी नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज बुधवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांची मातोश्रीवर (Matoshree)जाऊन भेट घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी मान यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील सर्वच राजभवन हे भाजपचे हेडऑफिस बनले आहेत. आणि राज्यपाल हे भाजपचे स्टार कँपेनर बनले आहेत, असा हल्लाबोल यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे.

Sengol History : चोल साम्राज्याशी संबंधित सेंगोल कसे बनले भारतीय सत्तेचे प्रतीक?

यावेळी भगवंत मान म्हणाले की, मातोश्रीवर आल्यानंतर आम्हाला घरासारखी वागणूक मिळते. उद्धव ठाकरेंकडून खूप मान सन्मान मिळतो, त्यामुळे त्यांचे आभार मानतो. ते म्हणाले की,उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाही धोक्यात आहे, मोठ्या धोक्यात आहे. कसे लोकांमधून निवडून आलेल्या लोकांऐवजी निवडलेले लोकं राज्य चालवत आहेत. लोकशाही म्हणजे निवडून आलेल्या लोकांनी राज्य चालवणे असा असतो. हे राज्यपाल म्हणजे निवडलेले असतात. राज्यपालांची निवड ही लोकांमधून केली जात नाही. केंद्राकडून राज्यपालांची निवड करुन विरोधक राज्यसरकारला विरोध करण्यासाठी सांगितलं जातं.

यावेळी मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सर्वोच्च न्यायालयातही जावे लागले. ते म्हणाले की, आमच्या राज्याचे राज्यपाल तर अधिवेशनामध्ये माय गव्हर्नमेंट नाही म्हणणार. त्यावर आम्ही विचारले की, आपण माय गव्हर्नमेंट का म्हणणार नाहीत. भाषण जे लिहिलंय ते तर तुम्हाला वाचावे लागेल. जे संविधानामध्ये लिहिलंय. त्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयातून ऑर्डर आणावी लागली. नाहीतर आमचे राज्यपाल धीस गव्हर्नमेंट (हे सरकार) असं म्हणणार होते.

देशातील सर्वच राजभवन हे भाजपचे हेडऑफिस बनले आहेत. आणि राज्यपाल हे भाजपचे स्टार कँपेनर बनले आहेत, असा हल्लाबोल यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे. भाजपला प्रत्येक राज्यात आपली सत्ता हवी आहे. सर्वच ठिकाणी आपलच राज्य असावं असं भाजपला वाटत आहे.

मुख्यमंत्री मान म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याप्रमाणे मतदानातून निवडून आले नाही तर पोटनिवडणुकीतून निवडून येत आहेत. जर पोटनिवडणुकीतून जमले नाही तर विकत घेतले जात आहेत. देशाचे विरोधक तेच आहेत जे सध्या देशाचे राज्यकारभार चालवत आहेत. लोकशाहीची हत्या करत असल्याची घणाघाती टीका यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube