Ashok Chavan Speak on Maratha Reservation : मागील चाळीस दिवस सरकारने काय केलं? असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. राज्यात सध्या पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगेंनी(Manoj Jarange) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसल्याने सरकारकडून जरांगेंना आणखी वेळ मागण्यात येत आहे. त्यावरुन आता अशोक चव्हाणांनी सरकारलाच सवाल केला आहे.
Riteish Deshmukh: जरांगेंचं आंदोलन अन् मराठा आरक्षणाबद्दल रितेश देशमुखची खास पोस्ट चर्चेत
अशोक चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला एक महिना दहा दिवस दिले होते, तरीही सरकारला आणखी वेळ हवा आहे, मग गेल्या एक महिना दहा दिवस सरकारने काय केले? असा सवाल माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.
Nagraj Manjule Naal 2: नागराज मंजुळेंच्या ‘नाळ 2’मधील नवं धमाकेदार गाणं प्रदर्शित
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारला आणखी वेळ द्यावा, असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले होते. यावर प्रश्न विचारला असता, अशोक चव्हाण यांनी एक महिना दहा दिवस सरकारने काय केले? याचे उत्तर दिले पाहिजे. त्या काळात निर्णय घेण्यात तुम्हाला काय अडचणी आल्या हे लोकांना कळायला पाहिजे. त्याशिवाय तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? असाही सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
Maratha Reservation म्हटलं की, अजितदादांना डेंग्यू झाला; जरांगेंची कन्या सरकारवर भडकली
मनोज जरांगे म्हणाले :
आता महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा फोन आला होता. ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण आणि प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय घेतो. तसेच त्यांनी सांगितलं की, ज्यांचे कुणबीचे पुरावे आहेत. त्यांना प्रमाणपत्र देऊ असं सरकार म्हटलं आहे. पण आम्ही त्यासाठी तयार नाहीत. मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, तुम्ही ज्यांचे कुणबी असल्याचे पुरावे सापडले त्यांना आरक्षण देणार असले तर आम्हाला ते मान्य नाही. तसं केल तर हे आंदोलन आणखी तीव्र करू. असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. तर विखे पाटलांनी सांगितलं आहे की, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम अहवाल स्विरकारला आहे. त्यामुळ ते बैठक बोलावत आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन केली जात आहे. आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. राजकीय नेत्यांना अडवून त्यांना जाब विचारला जात आहे. तर काही ठिकाणी तोडफोडही होत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परिस्थिती चिघळली. बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. काही तासांपूर्वी माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेच्या घराला आग लावल्यानंतर आता भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
मनोज जरांगे यांनी चाळीस दिवसांची मुदत देऊनही मराठा आरक्षण न मिळाल्यानं त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेक ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत