Congress Leader Nana Patole On Malhar Certificate : राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून एक नवीन वाद सुरू झालाय. ‘हलाल आणि मल्हार’वरून राज्यात वातावरण तापलेलं आहे. भाजप (BJP) नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र (Malhar Certificate) देण्याची घोषणा केलीय. यावर आता कॉंग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांना भाष्य केलंय. मंत्र्यांच्या काही मर्यादा असतात, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.
मंत्र्यांनी कुठल्याही सामाजिक आणि धर्माच्या लोकांची चेष्टा होता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे. कुठले कायदे आणायचे, हा सरकारचा निर्णय असतो. महाराष्ट्राला तोडू नका, हा सल्ला आम्ही त्यांनी देतो. सरकारची मानसिकता (Malhar Certificate For Mutton Shops) समजा. हिंदू मुस्लिम वाद टाळला पाहिजे. मंत्र्यांना तंबी दिली पाहिजे, असं देखील आवाहन नाना पटोले यांनी केलंय.
अखेर धंगेकरांनी भात्यातून बाण सोडला; राऊत अन् शिंदेंच्या आरोपांवर दिलं धारदार प्रत्युत्तर
पटोले म्हणाले की, भोंग्यांसदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले आहेत. ते किती आवाजात चालवावे, हे एका धर्मासाठी न्हवते. कोर्टाने निर्णय दिला असेल, तर त्याचं पालन करणं गरजेचं आहे. त्यांनी जातीचा तर उल्लेख केलेला नाही असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय.
आरोग्य विभाग घोटाळा विषय आता सभागृहात येईल. बजेटवर चर्चा झाल्यावर आम्ही बोलू. सरकारने यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केलीय.
प्रकाश सोलंकी यांचं मत माहित नाही. पण निवडणूक आयोगाच्या पलीकडे जाऊन खर्च केला असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय.
सुरेश धसांना सहआरोपी करा; धनंजय मुंडेंचे भाऊ संतापले, किती दिवस गप्प बसणार…
राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी काल राज्यातील सर्व झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी पोर्टल सुरु करण्याची घोषणा केलीय. यानुसार सर्व नोंदणीकृती मांस विक्रेत्यांनाच केवळ ‘मल्हार प्रमाणपत्र’ दिलं जाणार आहे. या नियमानुसार महाराष्ट्रामध्ये मटण विकणारी दुकाने नोंदणीकृत असणार आहेत.