Kunal Raut arrest : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. कुणाल राऊत हे माजी राज्यमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे पुत्र आहेत. कुणाल राऊत आणि त्यांच्या साथीदारांनी शनिवारी सायंकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन ‘मोदी की गॅरंटी’ (Narendra Modi) लिहिलेल्या पोस्टर्सना काळे फासले. तसेच मोदी शब्दावर भारत असं स्टिकर लावून पोस्टर्सची विटंबना करण्यात आली. त्यानंतर आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शनिवारी घडलेल्या या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना नोटीस बजावून पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र कुणाल राऊत आणि त्याचे साथीदार सकाळपासून बेपत्ता होते. यानंतर कुणाल राऊत यांना नागपूर जिल्ह्यातील कुही येथून नागपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य जनतेच्या पैशातून स्वतःचा प्रचार करत आहेत. असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी निदर्शने करत नागपुरातील जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर मोदींऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिकटवले. यासोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोलाही काळे फासले. या आंदोलनामुळे काहीवेळा नागपूर जिल्हा परिषदेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजपशासित राज्याचं समान नागरी कायद्याच्या दिशेने मोठे पाऊल, मसुद्यात नेमंक काय?
भारत सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर लावण्यात आले आहेत, जेणेकरून सर्वसामान्यांना योजनेची माहिती मिळावी. काही पोस्टर्स आणि बॅनर नागपूर जिल्हा परिषदेच्या आवारातही लावण्यात आली आहेत. या बॅनर्सवर भारत सरकारच्या योजनांची फारच कमी माहिती आहे. तसेच सरकारी योजना ही मोदी सरकारची हमी असल्याचा उल्लेख आहे.
राणे केवळ भाजपची लाचारी करतात, पण आता भुंकणाऱ्यांचे दिवस…; विनायक राऊतांची जहरी टीका
या योजना कोणासाठी आहेत, कोणते निकष आहेत, लाभासाठी कोणाशी संपर्क साधावा, याची माहिती या बॅनरवर नसल्याने जनजागृतीचा उद्देश सफल होताना दिसत नाही. तसेच पंतप्रधान मोदी हे केवळ सरकारी आवारात नागरिकांची दिशाभूल करून आपला प्रचार करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केला आहे.
पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार अन् दिल्लावाल्यांना महाराष्ट्राचं पाणी…; उद्धव ठाकरेंचा इशारा