Prithviraj Chavan : देशभरात आता लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन केली आहे. तर दुसरीकडे भाजपने एनडीएचा विस्तार करत जुन्या आणि नव्या मित्रांची शोधाशोध सुरू केली आहे. यातच आता ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा दावा केला आहे. भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र आले तर मोदींचा (PM Modi) पराभव निश्चित होईल, असा दावा चव्हाण यांनी केला. लोकसभेची निवडणूक ही स्वातंत्र्याच दुसरी लढाई असून या निवडणुकीला भाजपविरुद्ध (BJP) इंडिया आघाडी उमेदवार अशाच पद्धतीने सामोरे गेले पाहिजे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे की नाही? ज्याचा-त्याचा अधिकार, मनोज जरांगेंचे नारायण राणेंना प्रत्युत्तर
काँग्रेसने (Congress) राज्यात जनसंवाद यात्रा काढली आहे. ही यात्रा करवीर तालुक्यातील वडणगे येथे पोहोचली. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना चव्हाण यांनी मोदी पराभवाचा फॉर्मुला सांगितला. ते पुढे म्हणाले, देश सध्या अराजकतेकडे वाटचाल करत आहे. कर्जाचा बोजा वाढला आहे. देशात धार्मिक आणि जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जर भाजप पुन्हा सत्तेत आला तर पुढील विधानसभा निवडणुकाही होणार नाहीत. देशात हुकूमशाही येईल, अशी भीती चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केली.
दोन्ही निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी भाजपविरोधात मतदान केले होते. मात्र ही मते विखुरलेली होती. त्यामुळे 30 टक्के मते घेणारे मोदी सत्तेत आले. आता यापुढे असे होऊ नये यासाठी 28 पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. आता या आघाडीचा भाजपने इतका धसका घेतला आहे की देशाचे नाव बदलायला निघाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करायचा हाच उद्देश सर्वांनी ठेवला पाहिजे, असे चव्हाण यावेळी म्हणाले.
‘… तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन’; चिठ्ठी प्रकरणावरून मनोज जरांगेंचं धक्कादायक विधान