‘… तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन’; चिठ्ठी प्रकरणावरून मनोज जरांगेंचं धक्कादायक विधान

  • Written By: Published:
‘… तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन’; चिठ्ठी प्रकरणावरून मनोज जरांगेंचं धक्कादायक विधान

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या १७ दिवसांपासून आंदोलन करत आहे. काल रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि गिरीश महाजन हे अंतरवली गावात तळ ठोकून होते. यावेळी रावसाहेब दानवेंनी जरागेंना एक चिठ्ठी दिली होती. याच चिठ्ठीवरून वादंग उभा राहिला आहे. काहींनी या चिठ्ठीबद्दल संशय व्यक्त केला होता. दरम्यान, यावर जरांगे पाटील यांनी भाष्य केलं. चिठ्ठीविषयी बोलतांना जरागेंनी थेट आत्महत्येचा इशारा दिला.

जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषणाला करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन उपोषण सोडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दानवेंनी दिलेल्या चिठ्ठीचा उल्लेख केला. ते म्हणाले, आम्ही असे चिठ्ठीफिठ्ठीचे धंदे करत नाही. मी उभ्या आयुष्यात राखरांगोळी केली. मला माझ्या रानाचा बांध कुठं आहे हेही माहित नाही. मी इतकं रात्रंदिवस समाजासाठी काम करतो. योगायोगाने माझा बाप इथं आला आहे. मी मांझं मोठेपण सांगत नाही, माझा बाप कष्ट करतो आणि आम्हाला खाऊ घालतो. ते खाऊन हा पठ्ठ्या समाजाचं काम करतो.

Maratha Reservation : पोटातले ओठावर आणताना यापुढे… राज ठाकरेंचा सरकारला सणसणीत टोला 

जरांगे म्हणाले, एकाने जरी मला म्हटलं की, तुला फिरायला एक रुपया दिला आहे. तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन. हे असले चिठ्ठीफिठ्ठीचे कारण आम्हाला सांगायचं नाही. ते आम्हाला सहन होणार नाही. जे बेगडी लोक असतात, त्यांना हे सहन होईल, मी सहन करू शकत नाही, असा इशारा जरांगेंनी दिला.

दानवेंनी दिलेल्या पत्रावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, लईच अवघड खेळ आहे. रावसाहेब दावनेंनी रात्री एक चिठ्ठी काढली. यानंतर पत्रकारांनी ती कशाची आहे, असं विचारु विचारू मला बेजार करून टाकलं. हे मला रात्रीची झोपही य़ेऊ देईलना. रात्री रग ओढायला लागले. कोण नेता होता, असं विचारलं जात होत. मात्र, मी सांगून टाकतो की, मी तसले धंदेच करत नाही. मी खानदानी घरात जन्माला आलो आहे.

ते म्हणाले, मी कोणाच्या सांगण्यावरून आंदोलन करत नाही. मी तशी औलाद नाही. त्या चिठ्ठीत स्पष्टपणे आमच्या मागण्यांवर चर्चा केलेली होती. रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांनी मला ती चर्चा अशी आहे, असं सांगत सांगत ती चिठ्ठी दिली. मी माझ्या मराठा समाजासमोर पारदर्शक आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube