विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश अमित शाहांचे…फडणवीसांचा राहुल गांधींना खोचक सवाल

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Untitle (37)

Untitle (37)

Devendra Fadanvis On Rahul Gandhi : नीटच्या मुद्द्यावरुन सुरु असेलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनने गोळीबाराचे आदेश केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी दिले असल्याचा आरोप कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. या आरोपावरुन संसदेत गदारोळ झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी गांधी यांनी माफी मागण्याची मागणी केली. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून राहुल गांधी युवकांसाठी सकारात्मक बोललेत का? असा खोचक सवाल केला आहे.

आवारापन 2’च्या प्रदर्शनासाठी अवघे 16 दिवस बाकी; निर्मात्यांनी उलगडला शिवम पंडितचा नवा लूक, ‘तेरा मेरा रिश्ता’ची भावनिक झलक प्रदर्शित

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, खोटे आरोप केल्याने युवकांना काहीही मिळणार नाही. कोणत्याही नेत्याने आरोप केले पाहिजेत, परंतू देशाच्या युवकांसाठी आपण काय बोललात? कोणते उपाय सुचवलेत? कोणती गोष्ट बोलले की युवकांचं कल्याण होईल, खोट्या गोष्टी बोलणं, आरोप करणं, यामुळे युवकांनाा काही मिळणार नाही. राहुल गांधी देशाच्या युवकांसाठी सकारात्मक बोललेत का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला आहे.

स्त्री विषयक समस्यांचा मागोवा घेणाऱ्या ‘बंधिनी’ चित्रपटातून साकारणार स्त्री भावविश्वाची कहाणी


राहुल गांधी काय म्हणाले होते?

आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरायचे आदेश मंत्री अमित शाहांनीच दिले होते. आता पंतप्रधान मोदींनी अमित शाहांना मंत्रिपदावरुन हटवावं. पॅलेट गन वापराचे आदेश कोणाचे आहेत? याची निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करा, कोणी आदेश दिले, हे कसे झाले. आमच्या पोरांवर गन कोणी रोखली? आणि का?
गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय पॅलेट गन चालवू शकत नाहीत गृहमंत्रालयाची परवानगी लागते, असंही राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

दिल्लीतील लाठीचार्ज हा गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानेच केला. अमित शाहांमुळेच आंदोलक विद्यार्थी हे रक्तबंबाळ झाले, चिरडले गेले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. अमित शाहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली. अमित शाह हे देशाचे हिरो आहेत अशी इमेज निर्माण केली जात आहे. त्यासाठी मोठा पैसा लावण्यात आला आहे, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. परंतु विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जमुळे त्यांच्या इमेजचा फुगा फुटला आहे, असा टोला राहुल गांधी यांनी केला.

Exit mobile version