भाषेत मराठीची शुद्धता पण विचारांचा इतरांना त्रास होणार नाही अशी अपेक्षा; फडणवीसांचा बापटांना सल्ला!
Devendra Fadanvis on Vidyanand Bapat यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. पण नागरीकांच्या सण-उत्सवाबाबतच्या भावना समजून घेण्याचा सल्ला दिला
Devendra Fadanvis on Vidyanand Bapat who Raised a voice against DJ : पुण्यासह राज्यात ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ (DJ-Free Ganeshotsav) हा मुद्दा चर्चेत आहे. गणेशोत्सवात डीजेच्या कर्कश आवाजाने होणाऱ्या ध्वनीप्रदुषणामुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांनी या विरोधात आवाज उठवला. त्यांना यामुळे गणेशमंडळांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. पण त्याचवेळी त्यांना इतर नागरीकांच्या सण-उत्सवाबाबतच्या भावना समजून घेण्याचा सल्ला देखील दिला आहे.
पूर्वी नास्तिक नव्हता, पण परिस्थितीनुसार…; विद्यानंद बापटांबद्दल वडिलांनी सांगितली खास गोष्ट
सण उत्सव साजरा करताना ते जास्तीत जास्त पारंपारीक असला तर जास्त चांगलं असतं. यावर माझं पुण्याच्या सीपींशी चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच पुण्यामध्ये डीजेचं जे स्तोम माजलेलं आहे. ते कमी होताना किंवा कायमचं बमद होता ना दिसेल. तसेच सण उत्सवांचं स्वरूप पारंपारिकतेकडे नेण्यासाठी कोणत्याही कायद्यापेक्षा ते लोक सहभागाने होणे गरजेचं असतं. त्यामुळे हा बदल एकदम होणार नाही. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.
अक्कलदाढ म्हातारपणात पडली! जरांगेंची भुजबळांवर बोचरी टीका, राजकीय भूमिकेवरूनही घेरलं
तसेच पुढे सध्या डीजेला विरोध केल्याने तसेच त्यांच्या भाषेमुळे प्रचंड चर्चेत आलेले पुण्याच्या नारायण पेठेतील नागरीक विद्यानंद बापट यांच्यावर देखील देवेंद्र फडणवीस बोलले. ते म्हणाले की, विद्यानंद बापट यांची मराठी ट्रेंडिंगला आहे. मराठीच्या शुद्धतेचा नमुना विद्यानंद बापट यांच्या भाषेतून समोर आला. आता विचार मांडताना इतरांना त्रास होणार नाही. ते सर्वसमावेशक मत मांडतील अशी अपेक्षा आहे.