Download App

विनोद तावडेंना थेट दिल्लीतून घेरलं! कॉंग्रेसचा सवाल, म्हणाले सत्तेचा गैरवापर…

  • Written By: Last Updated:

Supriya Shrinate Press Conference Allegations 15 Crores In Vinod Tawde Diary : राज्यात उद्या मतदान होणार आहे. दरम्यान आज भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांना महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडण्यात आलं, असा आरोप केला जात आहे. कॉंग्रेसने (Congress) त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर यासंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केलाय. कॅप्शनमध्ये म्हटलंय की, विनोद तावडे हे एका पिशवीत पैसे घेऊन तेथील लोकांना बोलावून पैसे वाटत होते. ही बाब जनतेला समजताच मोठा गोंधळ उडाला. विनोद तावडेंचे पैसे घेऊन अनेक व्हिडिओ समोर येत (Supriya Shrinate Press Conference) आहेत.

महाराष्ट्रात मतदान होण्याआधीच भाजपचे नेते पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा (Assembly Election 2024) आरोप कॉंग्रेसकडून करण्यात येतोय. यात कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय.

विनोद तावडेंना निवडणूक आयोगाचा दणका! राजन नाईकांवरही गुन्हा दाखल…

कॉंग्रसने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, भाजप नेते विनोद तावडे यांना काही लोकांनी घेरलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या हातामध्ये पैसे असून घटनास्थळी मोठे गोंधळाचे वातावरण आहे.चोर आहेत, अशा घोषणा दिल्या जात आहेत. घटनास्थळी पोलीस देखील पोहोचलेले आहेत. ते जमाव शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.

या घटनेनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटलंय की, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे खुलेआम पैसे वाटण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून 5 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच त्यांच्याकडे एक डायरी सापडली असून त्यात 15 कोटींचा हिशेब आहे, असा देखील आरोप केला जात आहे.

विनोद तावडेंच्या डायरीत 15 कोटी; क्षितिज ठाकूर यांचा गंभीर आरोप; विरोधक आक्रमक

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी माध्यमांशी बोलताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांनी म्हटलंय की- निवडणुकीच्या काही तास आधी हे पैसे का वितरित केले जात आहेत? निवडणूक प्रचार संपल्यानंतर इतर कोणत्याही मतदारसंघात कोणीही राहू शकत नाही, असा नियम सांगतो, अशा परिस्थितीत विनोद तावडे विरार पूर्वमध्ये काय करत होते? असे सवाल श्रीनाटे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केले आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सत्तेचा आणि साधनसंपत्तीचा सर्रास गैरवापर होत आहे. आता खुद्द भाजपचे सरचिटणीसच, असं करताना रंगेहाथ पकडले गेले असल्याचं श्रीनाटे म्हणाल्या आहेत.

follow us