Download App

तहव्वूर राणाला फाशी द्या, सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

Congress leader Sushil Kumar Shinde On Tahawwur Rana : मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) अमेरिकेतून भारतात आणण्यात आलंय. भारत सरकार याला आपले राजनैतिक यश म्हणतंय, तर विरोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केलेत. राणाला लवकरात लवकर फाशी द्यावी. त्याचा कोणताही राजकीय फायदा घेऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केलीय. पीडितांचे कुटुंबीयही कठोर शिक्षेची मागणी करत आहेत, असं समोर आलंय. यावर आता काँग्रेस (Congress) नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

तहव्वूर राणाला फाशी झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. तहव्वूर राणा आपल्या देशाचा शत्रू असून (Mumbai Terror Attack) अनेक लोकांची त्यानी हत्या केली. अश्या माणसाला भारत सरकारने म्हणजेच युपीए सरकार आणि भाजप सरकारने त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न केले. कशा तऱ्हेने राणाला फाशी होईल, यासाठी प्रयत्न केले असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय.

बच्चू कडू म्हणाले, “विखे पाटील मतांचे भिकारी”, सुजय विखेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “बच्चू कडूंना..”

तहव्वूर राणा आमच्या देशाचा शत्रू आहे. ज्याने मुंबईच्या 26/11 चा प्लॅन केला. अनेक लोक ठार केले. त्यांची हत्या केली. या महाराष्ट्राला एक दु:खद प्रकारची आठवण दिली. अशा माणसाला आणण्यात भारत सरकारने कालच्या आणि आजच्या दोन्ही सरकारने प्रयत्न केले. यामध्ये मी मोठा का तु मोठा? हे करत बसण्यापेक्षा त्याला कशा तऱ्हेने फाशी होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे.

कसाबला फाशी दिली, तेव्हा कोणालाच सांगण्यात आलं नव्हतं. परंतु आता तहव्वूर राणाचं मोठ्या प्रमाणात टीका होतेय. यावर हे ठीकच आहे, जे झालं ते झालंच. अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.

तिरंदाजीत भारताची कमाल! मिक्स कंपाउंड टीम अमेरिकेत जिंकलं सुवर्णपदक

शिवसेना नेते संजय राऊत यांनी तहव्वूर राणा याच्या फाशीसंबंधी मोठे वक्तव्य केलंय. राणाला फाशी बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान देण्यात येणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. राऊतांनी यावेळी राणाचे भांडवल न करण्याचा टोला लगावला आहे.

 

follow us