Download App

‘नितेश राणेंनी वावड्या उठवू नये’; विजय वडेट्टीवारांनी भरला दम

Vijay Wadettivar on Nitesh Rane : नितेश राणे यांनी वावड्या उठवू नये, या शब्दांत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी भाजपचे आमदार नितेश राणेंना(Nitesh Rane) दम भरला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विजय वडेट्टीवार मंत्री होतील, अशी चर्चा असल्याचा दावा नितेश राणे(Nitesh Rane) यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना विजय वडेट्टीवारांनी(Vijay Wadettiwar)राणेंना सुनावलं आहे.

India Canada Conflict : पीएम मोदींच्या अपमानावर काँग्रेसचाही संताप; कॅनडात नेमकं काय घडलं?

विजय वडेट्टीवार म्हणाले, पहिल्यांदा नितेश राणे यांनी स्वत: मंत्री व्हावं, दुसऱ्याची बदनामी त्यांनी करु नये, ज्या लोकांना पक्ष बदलण्याचा अनुभव आहे, अशा लोकांच्या मुखातून असे शब्द येणं हे स्वाभाविकच असल्याची खोचक टीका वडेट्टीवारांनी यावेळी केली आहे.

Maneka Gandhi : ‘इस्कॉन’कडून गाईंची कसायांना विक्री! भाजप नेत्या मनेका गांधींच्या आरोपाने खळबळ

तसेच नितेश राणे जसं स्वत:कडे पाहत आहेत, तसंच त्यांनी दुसऱ्यांकडे पाहु नये, मी काँग्रेसचा एकनिष्ठ शिपाई असून माझ्या हायकमांडने माझा प्रामाणिकपणा पाहुनच माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्यामुळे नितेश राणे यांनी उठवू नये,अशा चॉकलेटला मी प्रतिसाद देणारा कार्यकर्ता नाही, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणेंना सुनावलं आहे.

डॉन अरुण गवळीची संचित रजा मंजूर, 28 दिवसांसाठी कारागृहाबाहेर

भाजपमध्ये मोठी खदखद सुरु आहेस, भाजपमध्ये उद्रेक दाबण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरु आहे, त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये कधीही स्फोट होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यानंतर प्रत्युत्तरात नितेश राणे यांनी वडेट्टीवारांबाबत भाकीत केलं होतं.

काय म्हणाले होते राणे?
भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. विरोधी पक्षनेते हे हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा आमच्या महायुती सरकारमध्ये सुरू असल्याचं राणे म्हणाले होते. संजय राऊतांना पवार कुटुंब फार चांगले माहिती आहे. त्यांच्या घराचे रेशन काड्या लावण्यामुळेच येते. बारामतीबद्दल बोलणे फार लांब आहे. सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य बारामतीसह महाराष्ट्रात आहे. असंख्य लोकांना जीवदान देण्याचे काम त्या वर्षानुवर्षे करत आहेत. म्हणून सुनेत्रावहिनी उद्या खासदार बनल्या तर हे राज्यासाठी आणि त्यांच्या मतदारसंघासाठी भलं होईल.

follow us