India Canada Conflict : पीएम मोदींच्या अपमानावर काँग्रेसचाही संताप; कॅनडात नेमकं काय घडलं?

India Canada Conflict : पीएम मोदींच्या अपमानावर काँग्रेसचाही संताप; कॅनडात नेमकं काय घडलं?

India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात (India Canada Conflict) असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. कॅनडातील खलिस्तानी भारताला डिवचण्याचे उद्योग रोजच करू लागले आहेत. यावर आता देशातील विरोधी पक्षांचाही संताप होत आहे. कॅनडात झालेल्या अशाच एका भारतविरोधी प्रदर्शनावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Chowdhury) यांनी भारत सरकारने आवश्यक पावले उचलावीत असे म्हटले आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, ज्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या कार्डबोर्ड प्रतिमेला लाथ मारण्याची हिंमत केली आणि भारतीय ध्वजाला आग लावली त्या कॅनडातील खलिस्तानी तत्वांच्या कृत्याचा मी काहीही न बोलता कठोर निषेध करतो. आता भारत सरकारने या भारतविरोधी आतंकवाद्यांविरुद्ध आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, असे चौधरी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. आता त्यांच्या या मागणीनंतर भारत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय घडलं ?

मंगळवारी कॅनडातील टोरंटो शहरात जवळपास 100 खलिस्तान्यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला आग लावली. येथील अनेक हिंदू परिवार दहशतीत जगत आहेत. याआधीही गरपतवंत सिंह पन्नू याने कॅनडातील हिंदूंना देश सोडून जाण्याची धमकी दिली होती.

वाद चिघळला! Canada कडून ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी; भारतातील असुरक्षित राज्यांचा केला उल्लेख

भारत-कॅनडातील वाद काय ?

कॅनडाच्या (Canada) नागरिकाच्या स्वतःच्या भूमीवर झालेल्या हत्येमध्ये अन्य कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनडाचे नागरिक हरदीप सिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहेत. जी 20 शिखर परिषदेतही कॅनडाने भारत सरकारच्या उच्च गुप्तचर अधिकाऱ्यांकडे चिंता व्यक्त केली होती.

पंतप्रधान मोदी यांनी देखील कॅनडातील अतिरेकी घटकांकडून केल्या जात असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली होती, असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) कॅनडाच्या संसदेत म्हणाले होते. खलिस्तानी अतिरेकी निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. ट्रुडो यांच्या या आरोपानंतरच भारत आणि कॅनडातील वादाला सुरुवात झाली.

Canada News : हा तर निर्लज्ज अन् वेडगळपणा; अमेरिकेतील तज्ज्ञांनी ट्रुडोंना फटकारलं

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube