Dcm Ajit Pawar News : मी लपून नाहीतर उधळमाथ्याने फिरणारा कार्यकर्ता असल्याचं विधान शरद पवारांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकारणात कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर या भेटीवर शरद पवारांपाठोपाठ आता अजित पवारांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला.
Tomato Price Drop : टोमॅटोच्या भाववाढीला केंद्राचा लगाम! आजपासून टोमॅटो 50 रुपये किलोने मिळणार
अजित पवार म्हणाले, मी लपून नाहीतर उधळमाथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मी कधी लपून गेलो तुम्हीच सांगा, तुम्ही मला पाहिलंत का? अपघात झालेल्या गाडीत मी नव्हतोच त्यामुळे उतरण्याचा प्रश्नच नाही, असं म्हणत अजित पवार यांनी ही गुप्तभेट नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
Horoscope Today 15 August 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
तसेच उद्योजक अतुल चोरडीया यांच्या घराण्याशी आमच्या दोन पिढ्यांचा संबंध आहे. चोरडीया यांचे वडील शरद पवारसाहेबांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे व्हिएसआयचा कार्यक्रम संपवून पवारसाहेब चोरडीयांच्या घरी जेवायला येणार होते. जयंत पाटील व्हिएसआयच्या कमिटीत असल्याने तेही पवारासाहेबांसोबतच होते. मी देखील व्हिएसआयमध्ये असून त्याच दिवशी माझा कार्यक्रम चांदणी चौकात होता, मंत्री नितीन गडकरींनी मला चांदणी चौकातल्या प्रकल्पाच्या उद्घाटनाबद्दल एक महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे मला त्या कार्यक्रमाला जायचं असल्याचं मी सांगितलं असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
भाजपसोबत नाही म्हणजे नाहीच; संभ्रम तयार करु नका! पवारांनी राऊतांना फटकारलं
चोरडीया यांच्या घरी जेवणासाठी मलाही बोलवलं होतं. त्यावेळी मी चोरडीयांच्या घरी जेवणासाठी गेल्याचं सांगितलं आहे. चोरडीया यांच्या दोन पिढ्यांचे आमचे संबंध आहेत, चोरडीयांचे वडील पवारासाहेबांचे वर्गमित्र असल्यानेच राजकारणापलीकडेही संबंध असतात, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जर एखाद्या दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलावले तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याचं काहीच कारण नसल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं. शरद पवार-अजित पवार यांच्या गुप्त भेटीनंतर राज्यात विविध तर्कवितर्क लावले जात होते. अखेर शरद पवारांनीही राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नसल्याचं भेटीनंतर ठणकावून सांगितलं होतं.