Ajit Pawar On Amol Kolhe : शिरुरचा उमेदवार (अमोल कोल्हे) यांना खासदारकीमध्ये नाही तर अभिनयात रस असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वरळी कांचनमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवार बोलत होते.
अजित पवार हे पवारांचे राजकीय वारसदार आहेत की नाही, याचा निकाल बारामतीकर घेणार
अजित पवार म्हणाले, अमोल कोल्हे यांना मीच निवडून आणलंय, त्यांनी फक्त निवडणुकीचा अर्ज भरला होता. त्यानंतर प्रचारासह सर्वच गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. निवडून आल्यानंतर दोन वर्षांनतर कोल्हे माझ्याकडे राजीनामा घेऊन आले होते. त्यावर आम्ही सर्व जणांनी त्यांना कसं-बसं समजावून सांगितलं होतं. त्यांच्या या निर्णयामुळे शरद पवार मलाच बोलत होतं. शिरुरच्या त्या उमेदवाराला खासदारकीमध्ये नाही तर अभिनयात रस असल्याची टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केलीयं.
मोठी बातमी : मतदानाच्या धामधुमीत काटेवाडीत पॉलिटिकल ड्रामा; सुप्रिया सुळे अजितदादांच्या भेटीला
2019 च्या निवडणुकीसाठी मंगलदास बांदल, प्रदीप कण, दिलीप वळसे पाटील हेदेखील होते. पण मी एक दिवस मुंबईत असताना अमोल कोल्हेंना फोन केला म्हटलो की, तुम्ही खासदारकीला उभं राहता का? त्यावर ते म्हणाले मी शिवसेनेत आहे. त्यानंतर मी त्यांना माझ्याकडे बोलावून घेत तुम्ही शिरुर लोकसभेचे उमेदवार असल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांना ठाकरेंचा फोन आला होता. आम्ही जेवलो अन् पत्रकार परिषदेत कोल्हेंच्या उमेदवारीची घोषणा केली.
छत्रपती संभाजी महाराजांची ते भूमिका साकारत असल्याने चांगलेच चर्चेत होते. कलाकार म्हणून लोकं त्यांच्यावर प्रेम करत होते. निवडून आल्यानंतर ते दोन वर्षानंतर राजीनामा देत असल्याचं मला सांगितलं. त्यावर मी त्यांना समजावून सांगितलं आणि पाच वर्षे खासदार रहा असं म्हणालो, पण कलाकारांना लोकांच्या बाकीच्या प्रश्नांशी काहीही घेण देणं नसतं, अशी टीका अजित पवार यांनी केलीयं.
‘तुमच्या विधानाचा बदला जनता घेणारच’; CM शिंदेंनी वडेट्टीवारांना ठणकावून सांगितलं…
आढळराव पाटलांनी राजकीय क्षेत्राचं व्रत स्विकारलंय…
मागील अनेक वर्षांपासून शिरुर भागात शिवाजीराव आढळराव पाटील राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क असून अमोल कोल्हे हे एक कलाकार आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करणं हे राजकीय क्षेत्रातल्या माणसांचं काम असंत, आढळराव पाटलांनी हे व्रत स्विकारलं असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.