Download App

महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, ‘निवडणुकीनंतर…’

आम्ही सर्व महायुतीचे आमदार आहोत. आम्ही सर्व एकत्र बसू आणि महायुतीत कुणाला मुख्यमंत्री करायचं ते ठरवू. - अजित पवार

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदरा कंबर कसली आहे. मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलं.

निवडणूक लढवली नाही, पण नशिबाने मुख्यमंत्री…; अजितदादांचा उद्धव ठाकरेंना मार्मिक टोला 

अजित पवार यांना एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर महायुतीचा भाष्य केलं. आगामी निवडणुकीनंतर सत्तेत आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी बजेटमध्ये चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही विकास करत आहोत. आम्ही आतापर्यंत काय काय काम केलं, कोणत्या मतदारसंघात काय केलं, याची माहिती लोकांना देत आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. आता फक्त महायुतीचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुतीच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं अजितदादा म्हणाले.

Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? अजितदादांनी दिलं ‘हे’ उत्त

मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, आम्ही सर्व महायुतीचे आमदार आहोत. आम्ही सर्व आमदार एकत्र बसू आणि कुणाला मुख्यमंत्री करायचं ते ठरवू. आता बात करायची गरज नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना अजित पवारांनी एकप्रकारे पूर्णविराम दिला आहे.

यावेळी बोलतांना अजितदादांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. उद्धव ठाकरे हे निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले. कारण त्यांच्याकडे बहुमताचा आकडा होता. तसेच तो नशीबाचाही भाग असतो, असा टोला अजितदादांनी लगावला.

मी महायुतीचा प्रचार करतोय….
शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ‘नो कमेंट’ असं उत्तर दिलं. ते म्हणाले, नो कॉमेंट्स… मी आता महायुतीचा प्रचार करत आहे, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, मागच्या एका मुलाखतीत अजित पवार यांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. त्यादृष्टीने अजित पवार गटाने जोरदार तयारी देखील सुरू केली. त्यामुळं आगामी काळात महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us