Maharashtra Political Crisis : 2019 ला निकाल आले होते. त्यावेळी एका मोठ्या उद्योपतीच्या घरी शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि मी तर भाजपकडून त्यांचे वरिष्ठ नेते, देवेंद्र फडणवीस होतो. सगळी चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितले की कुठेच बोलायचे नाही. त्यामुळे आतापर्यंत बोललो नाही. मला मीडियावाले विचारतात 2019 ला काय झाले? पण मला कोणाला बदनाम होऊ द्यायचे नाही. त्यानंतर अचानक बदल झाला आणि सांगितले की आपल्याला शिवसेनेसोबत जायचे आहे, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
ते पुढं म्हणाले की 2017 ला शिवसेना जातीयवादी म्हणून त्यांच्यासोबत जायचे नाही. असा काय चत्मकार झाली की शिवसेना मित्र पक्ष झाला. ज्या भाजपसोबत जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला. विचारात मतभेद असू शकतात पण इथं वेगळी भूमिका तिथं वेगळी भूमिका, हे कसं चालायंच, अशी टीका अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
2014 ला निकाल येत होते. त्यावेळी आम्ही सर्व सिल्व्हर ओकला बसलो होतो. प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांचे बोलणे झाले. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी बाहेर येऊन मीडियाला सांगितले की आमचा भाजपला पाठिंबा. त्यावेळी आम्ही गप्प बसलो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला गेलो. त्यावेळी जायचं नव्हतो तर जायला का सांगितलं? पुन्हा जे काही घडले ते सर्वांनाच माहिती आहे, असे अजित पवार म्हणाले.
भाजपसोबतच जायचं तर पुरोगामी साहेबांचा चेहरा कशाला वापरता? आव्हाडांचा अजित पवारांना सवाल
त्यानंतर 2017 ला सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, भुजबळ आणि भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील असे चौघे जण होतो. सगळं काही ठरलं. पालकमंत्री ठरले. मी कधी खोटे बोलणार नाही. खोटे बोललो तर पवारांचाही औलाद सांगणार नाही असे यावेळी अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
प्रफुल्ल पटेल पवार साहेबांची सावली, अजितदादांना पाठिंबा दिलाय, इशारा समजून घ्या!
त्यानंतर आम्हाला निरोप आला. सुनील तटकरेंना दिल्लीला बोलावले. त्यांच्या वरिष्ठांसोबत आपल्या वरिष्ठांची बैठक झाली. त्यावेळी भाजप नेत्यांनी सांगितले की शिवसेना 25 वर्षाचा आमचा मित्र पक्ष आहे आम्ही त्यांना सोडणार नाही. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी असे सरकार राहिल. त्यावेळी आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की आम्हाला शिवसेना चालणार नाही. त्यानंतर सर्व बारगळे, असे अजित पवार यांनी सांगितले.