प्रफुल्ल पटेल पवार साहेबांची सावली, अजितदादांना पाठिंबा दिलाय, इशारा समजून घ्या!

प्रफुल्ल पटेल पवार साहेबांची सावली, अजितदादांना पाठिंबा दिलाय, इशारा समजून घ्या!

Prafulla Patel attacks on NCP’s Internal Politics :  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अंतर्गत राजकारणाने राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. अजित पवार (Ajit Patel) यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या गटातील नेत्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनीही आपल्या भाषणातून थेट शरद पवार यांनाच जाहीर इशारा दिला.

एमईटी येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत दिलीप वळसे पाटील, आ. धनंजय मुंडे, आ. संग्राम जगताप, निलेश लंके, नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर, धर्मरावबाबा आत्राम, रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

पटेल म्हणाले, प्रफु्ल्ल पटेल या मंचावर का त्या मंचावर का नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं उत्तर मी आज तुम्हाला देणार नाही. योग्य वेळ येऊ द्या या प्रश्नाचं उत्तर मी सविस्तरणे नक्की देईन.

‘साहेब, बडव्यांना बाजूला करा, आम्हाला आशिर्वाद द्यायला या’; भुजबळांची आर्त साद!

2022 मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार हे नक्की झालं होतं. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण एक आमदारांनी पवार साहेबांकडे जाऊन त्यांना विनंती केली होती की या सरकारमध्ये भाजप सरकारमध्ये सामील व्हावं असं सांगितलं होतं. येथे आता उपस्थित असणाऱ्या आमदारांना देखील हे सगळं माहिती होतं. म्हणून आज हे अचानक घडलं किंवा अजितदादांनी काही पिल्लू सोडून दिलं आहे असा गैरसमज कुणीही करून घेता कामा नये.

याआधीही अनेक प्रसंग घडले आहेत. 2019 मध्ये दादांनी शपथ घेतली होती. काही पक्षविरोधी काम केल का. विरोधी काम केलं असतं तर अजितदादांना उपमुख्यमंत्री कसे केले असते. त्यांना विरोधी पक्षनेते कसे केले असते. बहुसंख्य आमदारांनी नेहमीच अजितदादांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली आहे. म्हणून अजितदादा आज या सन्मानाच्या पात्र आहेत, असे पटेल यांनी ठणकावून सांगितले.

माझ्या पुस्तकातून अनेक खुलासे होतील

प्रफुल्ल पटेल हा सौम्य स्वभावाचा माणूस आहे. नेहमीच कमी बोलतो. कमी बोललेलच बरं. कारण माझंही पुस्तक लिहीण्याची वेळ येणार आहे. पुस्तक ज्या दिवशी लिहीलं जाईल त्यावेळी महाराष्ट्र आणि देशाला काय काय समजेल हे मला आज तरी सांगण्याची गरज नाही.

साहेब, इशारा समजून घ्या

सगळ्या देशांनी आणि राज्याने पाहिलंय की शरद पवार जिथे तिथे प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल म्हणजे शरद पवारांची सावली असंच होतं. हे होतं की नाही. म्हणून आज मी तुम्हाला सांगतो मी आज या मंचावर आहे. पाठिंबाही देतोय. त्यामागे तुम्हाला इशारा समजला पाहिजे. आजही वेळ गेलेली नाही. आमच्या गुरुदेवांना मी विनंती करतोय आमच्याही भावना समजून घ्या, आम्हालाही आशिर्वाद द्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube