Download App

शरद पवारांना आपला पक्ष चालवणं शक्य नसावं म्हणून…; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

पक्ष चालवणं पवारांना शक्य नसावं म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार आला. पवारांना नवीन पक्ष बनवून पुन्हा तो कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची सवय.

Devendra Fadnavis Reaction on Sharad Pawar Statement : देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवारांन (Sharad Pawar) आज एक मोठं विधान केलं. येत्या दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत (Congress) येतील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दल विचार करतील, असं विधान पवारांनी केलं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. दरम्यान, पवारांच्या याच विधानावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) खोचक प्रतिक्रिया दिली.

T20 World Cup : आयर्लंड, पापुआ न्यू गिनी संघांची घोषणा; टी 20 वर्ल्डकप तयारी अंतिम टप्प्यात 

नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांनी शिरपूरमध्ये विजय संकल्प मेळावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. फडणवीस म्हणाले की, आपला पक्ष चालवणं पवारांना शक्य नसावं म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार आला असेल. पवारांना नवीन पक्ष बनवून पुन्हा तो कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची सवय आहे. याआधी त्यांनी अनेकवेळा पक्षा तयार केले आणि कॉंग्रेसमध्ये विलीन केल. आताही त्यांनी तसे संकेत दिले, पण, त्यात काही नवल नाही. त्यांना पक्ष चालवणं शक्य नाही, लोकसभा निवडणुकीनंतर पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, अशी बोचरी टीका फडणवसीांनी केली.

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? वाचा, पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले 

उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या पाठिंब्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, मराठी माणसांचे ते ठेकेदार नाहीत, ते म्हणजे मरदाठी नाही, ते म्हणजे महाराष्ट्र नाही, आम्ही देखील मराठी आहोत आणि मुंबईतील माणसाला त्यांनी निर्वासित त्यांनी केलं, असा हल्लाबोल फडणवीसांनी केलं.

शरद पवार काय म्हणाले?

इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना शरद पवार म्हणाले, आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक समन्वय राखून काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन कॉंग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज पवारांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लागू होईल का, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी सांगितले की, मला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणी मानणारे आहोत, असं पवार म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज