Devendra Fadnvis On Rahul Gandhi : राजघराण्यांचा अपमान करणं चुकीचं असून देशातील जनता राहुल गांधींना माफ करणार नसल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावलं आहे. दरम्यान नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त ‘तैय्यार है हम’ महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधींनी राजे -महाराजे इंग्रजांना सामिल असल्याचं म्हणाले होते. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी गांधींना सुनावलं आहे.
‘बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया’; गांधींची ‘अग्निवीर’चा दाखल देत सडकून टीका
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची आणि देशाची जनता राहुल गांधी यांना या विधानासाठी माफ करणार नाही. राजघराण्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला आहे, आपलं स्वत्व टिकवून ठेवलं आणि आज राहुल गांधी सरसकट देशातल्या राजांनी इंग्रजांशी साठ-गाठ केली होती, असं म्हणाले आहेत. राहुल गांधींनी हा राजघराण्यांचा अपमान केला असून तो चुकीचा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
भारतात आधी राजेशाही होती. देशात 500 ते 600 संस्थाने होती. या संस्थानांच्या माध्यमातून देशातील जनतेचा कारभार चालवला जात होता. त्यानंतर इंग्रज आले. इंग्रजांची आणि राजे महाराजांची भागीदारी होती. देशातल्या जनतेला सोबत घेऊन काँग्रेसने देशात स्वांतत्र्यासाठीचा लढा उभा केला. त्यानंतरच भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे.
Bus Fire Accident : मध्यप्रदेशात अपघातानंतर बस पेटली; 12 जणांचा होरपळून मृत्यू, 14 जखमी
भारताला स्वातंत्र्या राजेमहाराजांमुळे नाहीतर इथल्या जनतेचा लढा काँग्रेसने उभा केल्यामुळेच मिळालं असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. स्वातंत्र्यानंतर इथल्या महिलेला, दलितांना, आदिवासींसह सर्व जनतेला मतदानाचा अधिकार गांधी-नेहरु-आंबेडकरांनी काँग्रेसच्या माध्यमातून मिळवून दिला आहे. या विचारधारेविरोधात भाजपची विचारसरणी आहे. स्वातंत्र्याआधी दलित, आदिवासी, महिलांना अधिकार नव्हते. स्वातंत्र्यानंतरच हे अधिकार मिळाले आहेत. ही आरएसएसची विचारधारा आम्ही बदलली असल्याची जहरी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केलीयं.
तसेच मागील 10 वर्षांत मोदींनी किती लोकांना रोजगार दिलायं? असा सवाल गांधी यांनी उपस्थित केला आहे. तसेच देशातील तरुणांची शक्ती वाया जात असून तरुण आज-काल नोकरी करीत नाही. दिवसभरातील 7 ते 8 तास तो तरुण फोनवर सोशल मीडियावर सक्रिय असतो, त्यामुळे त्याची शक्ती वाया जात असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.